Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Japan News in Marathi : टोकियो : गेल्या पाच वर्षात पाच वेळा जपानच्या (Japan) नेतृत्त्वात मोठे बदल झाले आहेत. यंदा जपानाला पहिल्यांदा एक महिला पंतप्रधान मिळणार आहे. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने (LDP) शनिवारी (०४ सप्टेंबर) मार्जी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ताकाइची जपानच्या पहिला महिला पंतप्रधान बनण्याच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ताकाइची यांनी कृषी मंत्री शिंजिरो कोइझुमी यांचा पराभव केला आहे. पहिल्या फेरीत ताकाइची यांना १८३ मते तर कोइझुमी यांना १६४ मते मिळाली आहे. पण यामध्ये पूर्ण बहुमत न मिळाल्याने पुन्हा एकदा मतदान झाले आणि दुसऱ्या फेरीत ताकाइची यांनी निर्णायकत विजय मिळवला आहे. या अध्यक्षीय निवडणुकीत पाच उमेदवार होते. यामध्ये दोन विद्यमान मंत्री, तीन माजी मंत्री होते
ताकाइची या LDP च्या अतिरुढीवादी गटातून येतात. ऑक्टोबरच्या पुढच्या आठवड्यात संसदीय निवडणूका होणार आहे. या निवडणुकीत ताकाइची यांना बहुमत मिळाले तर त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होती. जर त्यांच्या प्रतिस्पर्धी कोइझुमी निवडून आल्या तर त्या गेल्या १०० वर्षातील जपानच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरतील.
यापूर्वी पंतप्रधान शिगेरु इशिबा यांनी सप्टेंबरमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या LDP पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला होता. यामुळे पक्षात असंतोष वाढला होता. इशिबा यांनी २०२४ मध्ये पदाभार स्वीकारला होता. परंतु त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत गमावल्यामुळे आणि पक्षातील वाढत्या असंतोषामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
जपानची लोक वाढत्या महागाईमुळे संतापले होते. यामुळे त्यांनी इशिबा यांच्या विरोधी पक्षाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली होती. यामुळे ताकाइची यांची निवड करण्यात आली. सध्या पक्षाला जनतेचा विश्वास पुन्हा मिळवू शकणारा नेता हवा आहे.
सध्या ताकाइची पंतप्रधान बनल्या तर त्यांच्यासमोर सर्वा मोठी आणि पहिली कसोटीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या संभाव्य बैठका आहेत. त्यांनी अमेरिकेच्या व्यापार कराराला विरोध केला आहे. यावर पुन्हा चर्चा झाली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस दक्षिण कोरियात होणाऱ्या आशिया-प्रशांता आर्थिक
सहकार्य (APEC) शिखर परिषदेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षात चार पंतप्रधान जपानमध्ये बदलले आहेत. ताकाइची आता पाचव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान असतील. सध्या या सर्व घडामोडींमुळे जपानच्या राजकारणात मोठी खळबळ सुरु आहे.
प्रश्न १. कोण होणार जपानच्या नव्या पंतप्रधान?
साने ताकाइची जपानच्या पहिला महिला पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रश्न २. साने ताकाइची यांना अध्यक्षीय निवडणुकीत किती मते मिळाली?
डेमोक्रॅटिक पक्षाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये साने ताकाइची यांना १८३ मते मिळाली आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कोइझुमी यांचा पराभव केला आहे.
अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश