ChatGPT कंपनी OpenAI च्या सीईओ सॅम ऑल्टमॅनला कंपनीनं हटवलं, भारतीय वंशाच्या मीरा मुरातीला दिली जवाबदारी

OpenAI ने ब्लॉगमध्ये लिहिले - कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पुनरावलोकनात, बोर्ड सदस्यांनी असा निष्कर्ष काढला की सॅम त्यांच्याशी संभाषण करताना स्पष्ट नव्हता, ज्यामुळे बोर्डाला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडथळा आला.

    चॅटजीपीटी ChatGPT तयार करणारी कंपनी ओपनएआयने (OpenAI )  शुक्रवारी सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवले. ते कंपनीचे सह-संस्थापकही आहेत. आता ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती (Mira Murati) सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील. कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी शोधणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ChatGPIT गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं होतं ज्याच्या वापराने जगभरात खळबळ माजवली आहे.

    ओपनएआयने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘कंपनीच्या बोर्डाने खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ऑल्टमॅनला काढून टाकण्याचा निर्णय बोर्डाने केलेल्या पुनरावलोकन आणि चर्चेनंतर घेण्यात आला. पुनरावलोकनातून असा निष्कर्ष निघाला की तो बोर्डसोबतच्या संभाषणात सातत्याने स्पष्ट नव्हता. पुढे चालू ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेवर बोर्डाला विश्वास नाही. OpenAI चे नेतृत्व करण्यासाठी.” त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ओपनएआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला चॅटजीपीटी चॅटबॉट जारी केला. हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन बनले आहे.

    मीरा मुराती या हंगामी सीईओ बनल्या

    कंपनीने पुढे सांगितले की ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओ म्हणून काम करतील. कंपनीकडून कायमस्वरूपी सीईओसाठी औपचारिक शोध घेतला जाईल.

     OpenAI मध्ये घालवलेला वेळ म्हणजे प्रेम..ऑल्टमन यांच ट्विट