China offeres helps to Zelensky saying Chinese soldiers be deployed in Ukraine
बिजिंग: अलीकडच्या काही काळात रशिया आणि युक्रेनमध्ये तीव्र संघर्ष सुरु असून या युद्धाचा शेवट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका-रशियामध्ये सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्य वोलोडिमिर पुतिन यांनी युद्धविरामातंर्गत त्यांच्या देशासाठी सामूहिक सुरक्षेची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी युक्रेनमध्ये शांतता सैनिक तैनात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
चीनच्या तज्ज्ञांचा सल्ला
याच दरम्यान चीनचे जी कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ झोउ बो यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी युक्रेनला रशिया युद्धविराम करार चिकवून ठेवण्याठी चीन मदत करु शकतो असे म्हटले आहे. यासाठी चीन सैन्य युक्रेनमध्ये तैनात करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले आहे.
झोउ बो यांनी झेलेन्स्कींना सुचवले आहे, की चीन आणि भारतासारखे गैर-नाटो देश एकत्र येऊन युक्रेनमध्ये शांतता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकताता. त्यांच्या या विधानानने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
1990च्या दशकातील बीजिंगच्या सहभागाचा उल्लेख
झोउ बो, जे त्सिंगुआ विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीचे वरिष्ठ अधिकारी असून, त्यांनी शांतता स्थापनेसाठी चीनकडे पुरेशी लष्करी ताकद असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 1990च्या दशकातील बीजिंगच्या सहभागाचा उल्लेख करत सांगितले की, युक्रेनला सामूहिक सुरक्षा हमीशिवाय सुरक्षित वाटणार नाही. रशियाकडून हल्ल्याची भीती कायम राहिल्यामुळे युक्रेनला असुरक्षिततेची भावना होईल.
झोउ बो यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. चीन भारत आणि इतर प्रमुख शक्तींशी एकत्र येऊन युक्रेनला सुरक्षा हमी देऊ शकतो. तसेच त्यांनी म्हटले की रशिया युरोपच्या सैनिकांना युक्रेनमध्ये पाहू इच्छित नाही, कारण ते नाटोप्रमाणे वाटेल. यामुळे तणाव वाढू शकतो. युद्धानंतरच्या पुनर्बांधणीसाठीही चीन आपले योगदान देऊ शकतो असे म्हटले आहे.
झेलेन्स्की चीनच्या मदतीचा प्रस्ताव स्वीकारणार?
दरम्यान नाटोने त्यांच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर झेसेन्स्की इतर देशांच्या मदत घेण्याच्या पर्यायांवरही चर्चा करत आहेत. यामुळे युक्रेनला चीनची मदत मिळण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धासाठी चर्चेचा पहिला टप्पा
सध्या चर्चेचा पहिला टप्पा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रूबियो यांच्या स्तरावर होत आहे. अनेक देशांचे या चर्चेकडे लक्ष लागले असून युद्धाचा शेवट होईल अशी आशा जागतिक पातळीवरील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लवकरच डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.