
conflict broke out in six countries in Asia
ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!
भारताच्या शेजारी मुस्लिम देश पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सीमा तणावात वाढ झाली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा शांतता चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. हा वाद काही नवा नाही. पाकिस्तान अफगाणिस्तानवर त्यांच्या जमिनीवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करतो, तर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर खोट्या इस्लामचा प्रचार केल्याचा आरोप केला आहे.
पूर्वी हे दोन देश मुस्लिम भावंडे म्हणून ओळखली जात. मात्र २०११ मध्ये अमेरिकेने केलेल्या अफगाणिस्तावरील हल्ल्यात पाकिस्तानने पाठ फिरवली होती. तेव्हापासून दोन्ही देशांत कायमस्वरुपी तणाव आहे. २०२१ मध्ये तालिबान सरकारन पुन्हा सत्तेत आल्यापासून हा तणाव अधिक वाढला आहे.
थायलंड (Thailand) आणि कंबोडिया हे आग्नेय आशियातील देश आहे. भारताच्या सागरी संबंध असलेल्या देशात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. जुलै 2025 मध्ये दोन्ही देशांत तीव्र सीमा संघर्ष झाला होता. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मलेशियाने मध्यस्थीची भूमिका निभावत दोन्ही देशात युद्धबंदी केली होती. पण ही युद्धबंदी केवळ दोन महिन्यांसाठीच मर्यादित राहिली. दोन्ही देशांत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन्ही देशात सीमेलगत असलेल्या शीव मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. सोमवारी (०८ डिसेंबर) सकाळी थायलंडने कंबो़डिया सीमेवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कंबोडियाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षात एक थाई सैनिकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप केले आहे. सध्या दोन्ही देशांत पुन्हा एकदा तणावा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याच वेळी चीन (China) आणि जपान(Japan) मध्ये देखील तणावपूर्ण वातावरण आहे. तैवानवरुन दोन्ही देशात वाद सुरु आहे. जपानच्या नव्या महिला पंतप्रधान साने ताकाईची यांच्या तैवानवरील विधानानंतर हा वादा पेटला आहे. साने ताकाइचीने चीनला इशारा दिला होता की, त्यांनी तैवानवर हल्ला केला तर हा जपानच्या सुरक्षेला धोका मानला जाईल आणि याला प्रत्युत्तर दिले जाईल.
यामुळे ड्रॅगने संतप्त होत तैवानच्या बाबींमध्ये जपानला हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. नुकतेच चीनने जपानच्या लढाऊ विमांनान रडार लॉक केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला आहे.
चीनची चिथावणीखोर खेळी! जपानी लढाऊ विमानांवर ‘रडार लॉक’; टोकियोचा संताप उसळला