Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abraham Accord Deal : मध्यपूर्वेत ट्रम्प यांची कूटनीतिक चाल! इस्रायलशी हातमिळवणी केली,तरच…; इस्लामिक देशांना थेट इशारा

Abraham Accord Deal : ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत एक नवा डाव खेळला आहे. त्यांनी इराण कराराला अब्राहम कराराशी जोडले आहे. ट्रम्प यांच्या मते, या करारावर इस्लामिक राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्यास शांतत प्रस्थापित होईल. यामुळे या करारावर स्वाक्षरी झाली तरच इराणसोबतची शांतता चर्चा पुढे जाईल.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 09:49 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा इस्लामिक राष्ट्रांवर दबाव
  • अब्राहम करारावर स्वाक्षरी केली तरच इराणशी करार होणार
  • आता काय करणार अरब राष्ट्र?
Abraham Accord Deal : वॉशिंग्टन : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे शांतता चर्चा सुरु आहे. परंतु कारार होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी एक मोठी कूटनीतिक खेळी खेळली आहे. त्यांनी इराणसोबतच्या संभाव्य शांतता कराराला थेट अब्राहम कराराशी जोडले आहे. यामुळे इस्लामिक राष्ट्रांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. या करारावर स्वाक्षरी केल्यास इस्रायलला औपचारिक मान्यता मिळेल.

US Iran Tension : इराणसोबत डील करण्यासाठी तडफडत आहेत ट्रम्प? IRGC च्या ‘त्या’ दाव्याने खळबळ, नेमकं काय आहे कारण?

ट्रम्प यांचा अब्राहम करारासाठी इस्लामिक राष्ट्रांवर दबाव

ट्रम्प यांनी सौदी अरेबिया(Saudi Arabia), पाकिस्तान, तुर्की, आणि इजिप्त या राष्ट्रांना थेट इशारा दिला आहे. या देशांनी इस्रायलशी हातमिळवणी केली नाही, तर अमेरिका इराणशी सुरु असलेल्या वाटाघाटींवर पुनर्विचार करेल. त्यांनी म्हटले की, हे देश आमचे ऋणी असून त्यांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी करावी, ही त्यांची जबाबदारी आहे, असे ठणकावून सांगितले. ट्रम्प यांच्या मते, इस्रायलसोबत करार केल्यावर मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होईल.

काय आहे अब्राहम करार?

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 2020 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल (Israel) आणि अरब राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी करार करण्यात आला होता. यासाठी संयुक्त अरब अमिराती(UAE), बहरीन या देशांनी सहमती दिली होती. मोरोक्को, सुदान आणि कझाकस्तान या देशांनी देखील पुढे या कारारावर स्वाक्षरी केली. या कराराचे नाव यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचे कुलदेवता पैगंबर अब्राहम यांच्या नावारवरुन ठेवण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मते, या कराराचा सहभागी देशांनी मोठा फायदा झाला होता. यामुळे त्यांचे इस्रायलसोबत व्यापार, पर्यटन, सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्यला गती मिळाली होती. यामध्ये इतर इस्लामिक राष्ट्रांचा सहभाग वाढल्यास मध्यपूर्वेत देखील शांतता प्रस्थापित होईल असे ट्रम्प यांनी म्हटले.

इस्लामिक देशांसमोरील अडचणी

परंतु हा करार सर्वच देशांसाठी अनुकूल नाही. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान(Pakistan) साठी तर सर्वात मोठे आव्हान आहे. या दोन्ही देशांचा पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासाठी पाठिंबा आहे, ज्याला इस्रायल तीव्र विरोध करतो. यामुळे सौदी अरेबिया या करारवर स्वाक्षरी करणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सध्या ट्रम्प यांची ही कूटनीतिक खेळी यशस्वी ठरते काय याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इस्लामिक राष्ट्रांना काय इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, आणि इजिप्त या राष्ट्रांना अब्राहम करारावर स्वाक्षरी करण्यासा सांगितले आहे. यावर स्वाक्षरी झाली तरच इराणसोबतच्या कराराचा विचार केला जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले.

  • Que: इस्लामिक राष्ट्रांसमोर कोणते मोठे आव्हान आहे?

    Ans: अब्रहाम करार सर्वच राष्ट्रांसाठी योग्य नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा देण्यासाठी पाठिंबा देतात, ज्याला इस्रायलचा तीव्र विरोध आहे. अब्राहम करारावर स्वाक्षरी केल्यास इस्रायलला औपाचिरक मान्यता मिळेल आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे अशक्य जाईल. यामुळे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हा करार मान्य करणे अशक्य आहे.

Web Title: Middle east politics trump links iran deal to abraham accord deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Buffalo: सोशल मीडियाच्या ताकदीने वाचला 700 किलोच्या ‘डोनाल्ड ट्रम्प’चा जीव; बांगलादेश सरकारने खरेदीदाराचे पैसे का केले परत?
1

Trump Buffalo: सोशल मीडियाच्या ताकदीने वाचला 700 किलोच्या ‘डोनाल्ड ट्रम्प’चा जीव; बांगलादेश सरकारने खरेदीदाराचे पैसे का केले परत?

Venezuela Energy: व्हेनेझुएलाच्या खजिन्याची चावी आता ट्रम्प यांच्या हातात; 1 कोटी बॅरल तेल पोहोचले अमेरिकेत, वाचा कारण काय?
2

Venezuela Energy: व्हेनेझुएलाच्या खजिन्याची चावी आता ट्रम्प यांच्या हातात; 1 कोटी बॅरल तेल पोहोचले अमेरिकेत, वाचा कारण काय?

इराण-अमेरिका कराराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अस्वस्थ; स्वत:ला शांतिदूत म्हणत केलं ‘हे’ मोठं विधान
3

इराण-अमेरिका कराराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अस्वस्थ; स्वत:ला शांतिदूत म्हणत केलं ‘हे’ मोठं विधान

US-Iran War: संपूर्ण जग ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या शिखर परिषदेकडे लक्ष ठेवून; आता तरी बदलणार का मध्य-पूर्वेतील युद्धाची दिशा?
4

US-Iran War: संपूर्ण जग ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या शिखर परिषदेकडे लक्ष ठेवून; आता तरी बदलणार का मध्य-पूर्वेतील युद्धाची दिशा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.