Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atomic Threat : ‘अमेरिकाच जिंकेल!’ वाटाघाटी निष्फळ होताच ट्रम्पना राग अनावर; अणुबॉम्बवरून जगाला दिला युद्धाचा इशारा

Donald Trump इराणसोबतची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, तेहरानच्या माघारीबद्दल आपल्याला चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, हे स्पष्ट करत त्यांनी कठोर भूमिका घेतली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 12:14 PM
donald trump iran peace talks fail islamabad nuclear bomb warning 2026

donald trump iran peace talks fail islamabad nuclear bomb warning 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा सज्जड दम
  • अणुबॉम्बवर ‘रेड लाईन’
  • जे.डी. व्हान्स यांचे स्पष्टीकरण

Donald Trump warning to Iran nuclear bomb : जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पाकिस्तानमधील अमेरिका-इराण चर्चा (US-Israel Iran War) अखेर कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे. सलग २१ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतरही दोन्ही देश एका मतावर येऊ शकले नाहीत. या अपयशानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्याने संपूर्ण जगात युद्धाची भीती पुन्हा एकदा दाट झाली आहे. फ्लोरिडाहून परतल्यानंतर जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता.

२१ तासांचा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा आणि अपयश

इस्लामाबादमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि इराणचे प्रतिनिधी यांच्यात तब्बल २१ तास चर्चा झाली. या चर्चेचा मुख्य उद्देश हा इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणे आणि मध्य-पूर्वेतील तणाव कमी करणे हा होता. मात्र, इराणने अण्वस्त्रे मिळवण्याचे संकेत दिल्याने ही चर्चा फिसकटली. जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, “इराण अशा साधनांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांना वेगाने अणुबॉम्ब तयार करता येईल. जोपर्यंत ते हे थांबवण्याचे ठोस वचन देत नाहीत, तोपर्यंत अमेरिका मागे हटणार नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Price Hike: ‘पेट्रोलच्या किमती विसरू नका!’ ट्रम्प यांच्या नाकेबंदीला इराणचे ‘गणितीय’ उत्तर; अमेरिकेला रडवणारं समीकरण VIRAL

ट्रम्प यांचा इशारा: “इराणकडे अणुबॉम्ब असणार नाही!”

डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भाषेत इराणला सुनावले आहे. ते म्हणाले, “इराण सध्या खूप वाईट परिस्थितीत आहे, ते व्यथित आहेत. आम्ही त्यांच्याशी तासनतास बोललो आहोत आणि आम्हाला त्यांची परिस्थिती नीट माहित आहे. पण एक गोष्ट त्यांनी समजून घ्यावी की, इराण कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्र बाळगू शकत नाही. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही.” ट्रम्प यांनी इराणच्या वाटाघाटीच्या टेबलावर परतण्याबाबत विचारले असता सांगितले की, “ते परत येतात की नाही याची मला आता पर्वा नाही. आम्ही आमची बाजू स्पष्ट केली आहे.”

Trump reveals ‘desperate’ Iran wants nuclear weapon after failed peace talks and claims he ‘doesn’t care’ whether Tehran comes back to negotiating table https://t.co/if6ll81tt1 — Daily Mail US (@Daily_MailUS) April 13, 2026

credit – social media and Twitter

“काहीही झाले तरी अमेरिकाच जिंकणार!”

ट्रम्प यांनी केवळ इराणलाच नव्हे, तर जगालाही संदेश दिला आहे की अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे. व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, “काहीही झाले तरी विजय आपलाच (अमेरिकेचाच) होईल. करार होतो की नाही, याने आमच्या विजयावर फरक पडत नाही.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे आता राजनैतिक मार्गाऐवजी लष्करी कारवाईचे संकेत तर मिळत नाहीत ना? अशी चर्चा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात सुरू झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

मध्य-पूर्वेतील भविष्याची टांगती तलवार

इराण सध्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या या दुरवस्थेवर बोट ठेवत त्यांना नमवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, इराणने अण्वस्त्र निर्मितीचा हट्ट सोडलेला नाही, हे चर्चेच्या अपयशावरून स्पष्ट झाले आहे. आता जर इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच ठेवला, तर अमेरिका कठोर निर्बंधांसोबतच मोठा लष्करी निर्णय घेऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इस्लामाबादमधील या अयशस्वी चर्चेनंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि इराणमधील इस्लामाबाद चर्चा का अयशस्वी झाली?

    Ans: इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळाल्यामुळे आणि त्याबाबत ठोस आश्वासन देण्यास नकार दिल्यामुळे २१ तासांची चर्चा फिसकटली.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कोणता अंतिम इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्र बाळगू शकणार नाही आणि त्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका कठोर पाऊले उचलेल.

  • Que: जे.डी. व्हान्स यांनी चर्चेबद्दल काय म्हटले?

    Ans: व्हान्स यांनी सांगितले की, जोपर्यंत इराण अण्वस्त्रे न बनवण्याबाबत ठोस वचनबद्धता दाखवत नाही, तोपर्यंत कोणताही करार केला जाणार नाही.

Web Title: Donald trump iran peace talks fail islamabad nuclear bomb warning 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
1

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
2

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
3

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
4

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.