Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : ‘…तरच चर्चा होईल’; ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने पायदळी तुडवला, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

US Iran Ceasefire : अमेरिका इराणमधील शस्त्रसंधी २२ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. ही डेडलाईन संपण्यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन शस्त्रसंधी वाढवल्याची घोषणा केली आहे. पण इराणने प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 10:36 AM
iran rejects us ceasefire proposal

iran rejects us ceasefire proposal

Follow Us
Follow Us:
  • युद्धबंदीवरुन अमेरिका-इराणमध्ये वादाची ठिणगी
  • युद्धबंदीत वाढ करण्याचा ट्रम्प यांचा प्रस्तावाला इराणकडून नकार
  • केली ही मोठी मागणी
Iran Rejected US Ceasefire : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) काही निवळण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांतील वाद सोडवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. परंतु हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांमध्ये १० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. ही युद्धबंदी २२ एप्रिल २०२६ रोजी समाप्त होणार आहे. यापूर्वीच ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरुन यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. इराणने मात्र अमेरिकेचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

US-Iran Ceasefire : दिलासादायक ! डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवला; म्हणाले, ‘पाकिस्तानच्या विनंतीवरून…’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धबंदीच्या वाढीची घोषणा केली होती. ज्यावर इराणने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. युद्धबंदीची वेळ आम्ही ठरवू, अमेरिका नाही अशा कडक शब्दात इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावरुन २२ एप्रिल रोजी समाप्त होणाऱ्या अमेरिका-इराण युद्धबंदी वाढविण्याचे संकेत दिले होते. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर (Asim Munir) यांच्या विनंतीवरुन हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या मते, इराणची आर्थिक आणि राजकीय स्थिती सध्या नाजूक आहे. यामुळे एक संयुक्त शांतता प्रस्ताव सादर होईपर्यंत युद्धबंदीत वाढवण्यात येत आहे असे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांच्या घोषणनेतंर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा इस्लामाबाद दौरा पुढे ढकलण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या निर्णायामुळे संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता काहीशी कमी झाली आहे, मात्र दोन्ही देशांतील मतभेदांमुळे आणि अमेरिकेच्या इराण बंदरावरील नाकेबंदीमुळे अनिश्चितता कायम आहे.

इराणचे प्रत्युत्तर

दरम्यान इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणने कोणत्याही युद्धबंदीची मागणी केलेली नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले होते की, जोपर्यंत अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वरील नाकेबंदी मागे घेत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. ही नाकेंबदी थेट युद्धची चिथावणी म्हणून इराणने संबोधले आहे.

तसेच इराणचे सुरक्षा तज्ज्ञ मेहदी मुहम्मदी यांनी देखील ट्रम्प यांच्या प्रस्तावाला फेटाळले आहे. त्यांच्या मते, अमेरिका युद्धात हरली असून इराणवर निर्बंध लादू शकत नाही. यामुळे चर्चेचा प्रस्ताव मांडत इराणला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

تمدید آتش بس از جانب ترامپ هیچ معنایی ندارد. طرف بازنده نمی تواند شرایط تعیین کند. تداوم محاصره تفاوتی با بمباران ندارد و باید به آن پاسخ نظامی داد. ضمن اینکه تمدید آتش بس از جانب ترامپ قطعا به معنای خرید زمان به منظور ضربه غافلگیرانه است. زمان ابتکار عمل ایران است. — Mahdi Mohammadi (@mmohammadii61) April 21, 2026

अमेरिकेत भारतीयांचा श्वास गुदमरतोय? ४०% लोक देश सोडण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणसोबतच युद्धबंदी का वाढवली?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, इराणची आर्थिक आणि राजकीय स्थिती सध्या नाजूक आहे, यामुळे पाकिस्तानच्या विनंतीवरुन त्यांनी युद्धबंदी वाढवण्याची घोषणा केली आहे.

  • Que: इराणने अमेरिकेचा युद्धबंदीचा प्रस्ताव का फेटाळला?

    Ans: युद्धबंदी लागू झाल्यानंतरही अमेरिकेन इराणच्या बंदरावरील नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. यामुळे जोपर्यंत ही नाकेबंदी हटवली जात नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा शक्य नाही असे म्हणत इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

Web Title: Donald trump iran rejected us ceasefire middle east war update marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.