अमेरिकेत भारतीयांचा श्वास गुदमरतोय? ४०% लोक देश सोडण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कार्नेगीच्या रिपोर्टनुसार, तब्बल ४०% भारतीय-अमेरिकन आता देश सोडून दुसरीकडे स्थायकि होण्याचा विचार करत आहेत. यामागे अनेक कारणे सर्वेक्षणातून समोर आली आहेत. जाणून घेऊयात नेमकी काय कारण आहेत.
राजकीय अस्थिरता आणि समाजिक धुव्रीकरण : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अत्यंत कठोर धोरणे अवलंबवली आहेत. यामुळे राजकीय कट्टरतेत वाढ होत असून सुमारे ५८% भारतीयांनी अमेरिकेत असुरक्षितात जाणवू लागली आहेत. अमेरिकेतील समाजात सर्वसमावेशकता कमी होत होत चालली असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे.
ग्रीन कार्डसाठीची प्रतीक्षा : अहवालानुसार, अमेरिकेची इमिग्रेशन (Immigration) व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची झाली असून ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी लोकांना ३० ते ७० वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे तरुण पिढीला त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणवत आहे.
वाढती महागाई : गेल्या काही काळात अमेरिकेच्या न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवांमुळे मध्यमवर्गीय भारतीयांवर आर्थिक ताण पडत आहे.
Ans: कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशन पीस (२०२६) च्या अहवालानुसार, अमेरिकेतील राजकीय अस्थिरता, सामिजक धुव्रीयकरण, ग्रीन कार्डसाठी पाहावी लागणार वाट, महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवा यामुळे अमेरिकन-भारतीयांवर आर्थिक ताण पडत आहे. याचमुळेच ४० टक्के भारतीयांना अमेरिका सोडण्याची इच्छा होत आहे.
Ans: अहवालानुसार, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना मायदेशी परण्याची ओढ लागली आहे. तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था तरुणांना रोजगाराच्या संधीचे चित्र दाखवत आहे. बेंगळुरु, हैदराबाद यांंसारख्या शहरांमध्ये करियच्या संधीमुळे अनेक भारतीय अमेरिकेऐवजी मायदेशाला प्राधान्य देत आहेत. तसेच लोकांना आपल्या पालकांकडे राहण्याची आणि आपल्या संस्कृतीत राहण्याची इच्छा निर्माण होत आहे.






