Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump on Gaza War : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा आणखी एक युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी गाझामध्ये सुरु असलेल्या इस्रायल-हमास युद्ध (Israel Hamas War) अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले.
शुक्रवारी (26 सप्टेंबर) ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त करत म्हटले की, अमेरिका गाझातील सुरु असलेला संघर्ष थांबवण्याच्या अगदी जवळ आहे त्यांच्या मते, अमेरिकेमुळे आता गाझातील इस्रायली ओलिसांची सुटकाही सुनिश्चित होईल आणि युद्ध संपवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढेही जाऊ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रायडर कपसाठी निघताना व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी ट्रम्प यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी गाझातील युद्धावर भाष्य केले. ट्रम्प यांनी म्हटले की, मला आशा आहे की गाझातील युद्धबंदी जवळ आली आहे. यापूर्वी ट्रम्पयांनी इस्रालय आणि हमामध्ये अनऔपचारिक युद्धबंदीची मध्यस्थी केली होती. पण इस्रायलने २४ तासांत कराराचे उल्लंघन केले होते.
#WATCH | US President Donald Trump says, “It’s looking like we have a deal on Gaza. I think it’s a deal that will get the hostages back. It’s gonna be a deal that will end the war.” (Source: US Network Pool via Reuters) pic.twitter.com/OyeKXpIA3C — ANI (@ANI) September 26, 2025
याच वेळी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषाणात
गाझातून हमासला पूर्णपणे नष्ट करण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, हमास अजूनही गाझामध्ये सक्रिय आहे. यामुळे इस्रायलने लष्करी कारवाया तीव्र केल्या असून जोपर्यंत हमासचा अंत होत नाही. तोपर्यंत या कारवाया सुरु राहतील.
यामुळे ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या दाव्याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांत बेंजामिन नेतन्याहूंच्या (Benjamin Netanyahu) भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. त्यांच्या हमासला नष्ट करण्याच्या विधानावर अनेकांनी निषेधार्थ पाऊल उचलेल होते. अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या मते, इस्रायल हमास नष्ट करण्याच्या नावाखाली गाझातील पॅलेस्टिनींना लक्ष्य करत आहे. यामुळे गाझातील कारवाया थांबवस्या गेल्या पाहिजेत. पण नेतन्याहूंनी मात्र या सर्व आरोपांना फेटाळले आणि आपले भाष सुरुच ठेवले. त्यांना हमासवर जोरदार टीका केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धावर काय दावा केला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदी करार अंतिम टप्प्यात आला असल्याचे म्हटले. तसेच गाझातील ओलिसांची सुटका होणार असून हे युद्धबंदीच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचा दावा केला.
नेतन्याहूंनी संयुक्त राष्ट्रात हमासवर काय विधान केले?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांत हमासला पूर्णपणे नष्ट करण्याच्या त्यांच्या हेतूचे पुनरुच्चारन केले.
कधीपासून सुरु आहे इस्रायल हमास युद्ध?
ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केल्या होता. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले, जे आजही सुरुच आहे.
हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral