डोनाल्ड ट्रम्प यांनी केले तुर्कीच्या धोरणात्मक रणनितींचे कौतुक म्हणाले...
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाच्या नेत्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी बशर अल-असदच्या क्रूर कारभाराची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी असद च्या काळातील त्यांच्या धोरणांना चुकीचे म्हटले आहे. फ्लोरिडामधील एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सीरियातील परिस्थितीवर देखील आपले मत मांडले आहे. तसेच त्यांनी तुर्कीच्या धोरणांची प्रशंसा करत त्याला “स्मार्ट” म्हटले आणि तुर्कीने सीरियावर “अमित्रतापूर्ण कब्जा” ट्रम्प यांनी म्हटले.
तुर्कीच्या रणनितीक धोरणांचे कौतुक
तसेच ट्रम्प यांनी असेही सांगितले की, बशर अल-असदला सत्तेवरून हटविणाऱ्या इस्लामिक गटांच्या मागे तुर्कीचा हात होता. त्यांनी सांगितले की तुर्कीने मोठ्या प्रमाणावर कोणाचाही जीव न घालवता आपला हेतू साध्य केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “तुर्कीने त्यांना हजारो वर्षांपासून हवे होते, ते मिळवले आहे.” त्यांनी तुर्कीचे अध्यक्ष तैयप एर्दोगन यांचीही प्रशंसा केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुर्की सैन्याची मजबूत ताकद निर्माण झाल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी तुर्कीच्या धोरणांमुळे याचा प्रभावी अंमल होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
सीरियाच्या माजी अध्यक्ष बशर अल-असद ची निंदा
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी बशर अल-असदवर केलेल्या आरोपांमध्ये म्हटले की, “असद एक कसाई होता, त्याने लहान मुलांबरोबर जे केले ते अमानवी होते.” त्यांच्या मते, तुर्कीने या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेत सीरियावर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. या घडामोडींमुळे अमेरिका आणि तुर्की यांच्या संबंधांचा नवीन पैलू समोर येत आहेत. तसेच जागतिक राजकारणात तुर्कीचा प्रभाव वाढताना दिसतो आहे.
अमेरिकेचे ISIS दहशतवादी गटावर हल्ले
सीरियामध्ये असद सत्तेचा पतनानंतर अमेरिकेने सुमारे 900 सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेने या तैनातीचे प्रमुख उद्देश म्हणजे इस्लामिक स्टेट (ISIS) सारख्या दहशतवादी गटांना पुन्हा ताकदवान होण्यापासून रोखणे असल्याचे म्हटले आहे.याचबरोबर अमेरिकेने सीरियामधील ISIS लढवय्यांवर हवाई हल्ले केले होते. तसेच अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी असेही सांगितले की, अमेरिकन प्रशासन हयात तहरीर अल-शाम (HTS) या गटाशी संपर्कात आहे. HTS ने सीरियामध्ये काही मोठे हल्ले केले होते यामुळे बशर अल-असदला सत्ता सोडून देश सोडावा लागला होता.