फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या मोठ्या राजकीय संकटात आहेत. तसेच ते आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे. उपप्रंतप्रधान आणि वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. त्यांच्या अनअपेक्षित राजीनाम्यानंतर ट्रुडो यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (NDP) चे नेते जगमीत सिंग आणि 23 खासदारांनी ट्रुडोंच्या राजीनाम्याची थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रुडोच्या धोरणांवर जगमीत सिंग यांची टिका
ट्रुडोच्या धोरणांवर टिका जगमीत सिंग यांनी जोरदार टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅनडातील सामान्य नागरिकांना महागाईच्या विळख्याचा सामना करावा लागत आहे. याशिवाय सामन्य जीवनातील जीवनावश्यक गोष्टी देखीलमहाग झाल्या आहेत. याशिवाय, अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनेडियन उत्पादनांवर अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील हजारो नोकऱ्यांवर संकट आले आहे.”
सिंग यांनी सरकारवर देशाच्या मूलभूत समस्या सोडून पक्षांतर्गत संघर्षांमध्ये अडकून पडल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत जस्टिन ट्रूडो यांचे पंतप्रधानपदावर राहणे योग्य नाही. सध्या NDP कडून निवडणुकीची मागणी करण्यात आली नाही, मात्र या राजकीय उलथापालथीत ट्रूडो यांचा राजीनामा अटळ असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
LESS THAN a week ago, Justin Trudeau scolded Americans because we “voted for a second time to not elect [America’s] first woman president.”
TODAY: Trudeau’s female Finance Minister resigned because Justin tried to fire her for disagreeing with him.
Classic Woke narcissism. pic.twitter.com/ev074uvo2P
— Yitz Friedman (@friedman_yitz) December 16, 2024
ट्रूडो यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग
कॅनाडातील काही प्रमुख मीडियांच्या अहवालानुसार, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या मंत्रिमंडळाला सूचित केले आहे की ते लवकरच संसदेला संबोधित करत राजीनाम्याची घोषणा करू शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रूडो यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्यावर गंभीर विचार सुरू केला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनाडाविरोधातील आर्थिक धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या घटनाक्रमामुळे ट्रूडो यांच्या राजकीय स्थितीवर देखील परिणाम झाल्याचे स्पष्ट आहे.
आताची राजकीय परिस्थिती आणि ट्रूडो यांची वाटचाल
जस्टिन ट्रूडो यांनी काही काळापूर्वी भारतावर केलेल्या वक्तव्यामुळेही आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना टिकेचा सामान करावा लागला होता. आता घरगुती समस्यांमध्ये अडकलेल्या ट्रूडो यांना स्वतःची खुर्ची वाचवणे मोठे आव्हान आहे. सध्या त्यांच्या संभाव्य राजीनाम्याची चर्चा संपूर्ण कॅनाडामध्ये रंगली आहे. पुढील काही दिवसांत ट्रूडो यांचा निर्णय देशाच्या राजकीय दिशेला कलाटणी देणारा ठरणार आहे.