फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उद्या चीन भेटीला जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा भारत आणि चीनमधील LAC संदर्भातील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान डोभाल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेणार आहेत. 17 ते 18 डिसेंबर हा दौर असणार असून या दौऱ्याला भारत-चीन सीमेवरील दीर्घकालीन वाद सोडवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
पाच वर्षांनंतर होणार विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक
2020 मध्ये गलवान घाटीतील संघर्षानंतर ही पहिलीच विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी, डिसेंबर 2019 मध्ये अशी बैठक घेण्याच आली होती. LAC संदर्भातील समस्यांवर व्यापक समज वाढवणे आणि दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करणे हा या भेटीचा उद्देश आहे. गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांवर मोठा परिणाम झाला होता. ही बैठक यशस्वी झाल्यास पुढील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेसाठी मार्ग मोकळा होईल.
नवी दिल्लीतील चर्चेचा पुढचा टप्पा
काही दिवसांपूर्वीच भारत-चीनमधील वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन (WMCC) यंत्रणेद्वारे नवी दिल्लीमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही बाजूंनी या उच्चस्तरीय चर्चेची सहमती दर्शवली होती. गेल्या काही वर्षांत LACवरील तणावामुळे द्विपक्षीय संबंध मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. त्यामुळे हा संवाद दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दीर्घकालीन शांततेसाठी महत्त्वाचा टप्पा
NSA अजीत डोभाल यांचा चीन दौरा तसेच विशेष प्रतिनिधी स्तरावरील बैठक, भारत-चीन सीमावादाच्या शांततामय तोडग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. या उच्चस्तरीय चर्चेतून सीमावादावर स्थायी तोडगा काढण्यासाठी पुढील दिशानिर्देश मिळू शकतील. या बैठकीच्या यशस्वीतेमुळे LAC वरील तणाव कमी होऊन, भविष्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी नव्या वाटा निर्माण होतील.
भारत-चीन तणावर कमी करण्यावर सातत्याने प्रयत्न सुरू
2020 नंतर भारत आणि चीनने सीमा तणाव कमी करण्यासाठी अनेक सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न केले आहेत. उद्या होणारी बैठक दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या बैठकी दोन्ही देशांतील मतभेद मिटवून परस्पर विश्वास वाढवण्यावर भर देण्यात येईल.
तसेच, सीमा विवाद व्यवस्थापनासाठी स्थिर आणि दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करण्याची संधी देईल. भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरू शकते. जर सकारात्मक निष्कर्ष निघाले, तर सीमावादावर स्थायी तोडगा काढण्याचा मार्ग सुलभ होईल आणि शांततेचा नवा अध्याय सुरू होईल.