रशियात 8.7 तीव्रतेचा मोठा भूंकप; जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा (फोटो सौजन्य - iStock)
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये भूकंप झाल्याचे पाहिला मिळाले. अनेक ठिकाणी भूकंपामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यूही झाला आहे. भूकंपाच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असताना आता अमेरिकेतील अलास्का येथे शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी मोजण्यात आली. यामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील किनाऱ्यावर दुपारी १२.३७ वाजता एक जोरदार भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र सँड पॉइंटपासून सुमारे ८७ किलोमीटर दक्षिणेस होते. भूकंपानंतर सुमारे ७.५ लाख लोकांना त्सुनामीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत इशारा देखील देण्यात आला आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप काही माहिती मिळू शकली नाही.
हेदेखील वाचा : Delhi Earthquake: दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.7 रिश्टर स्केल
दरम्यान, अमेरिकेच्या अलास्का राज्यात गुरुवारी (दि.१७) भारतीय वेळेनुसार पहाटे २:०७ सुमारास भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी मोजण्यात आली, जी एक अतिशय शक्तिशाली भूकंप मानली जाते. या भूकंपाचे केंद्र अलास्का द्वीपकल्पाच्या आत ३६ किलोमीटर अंतरावर होते.
त्सुनामीचाही इशारा जारी
अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते, स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:३० नंतर अलास्का द्वीपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या पोपोफ बेटावरील सँड पॉइंटजवळ हा भूकंप झाला. ७.३ तीव्रतेच्या भूकंपानंतर, किनारी अलास्काच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रभावित भागातील लोकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातही झाला होता भूकंप
काही दिवसांपूर्वी, भूकंपाच्या धक्क्यांनी दक्षिण आशिया आणि युरोपला हादरवून सोडले होते. पाकिस्तानात तर नंतर ग्रीस आणि दक्षिण इटलीदरम्यान भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या दोन्ही घटनांमुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र घबराट निर्माण झाली. त्यावेळी सुदैवाने भूकंपांत कोणतीही जीवितहानी वा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले नव्हते. मात्र, अमेरिकेतील अलास्का येथे शक्तिशाली भूकंप झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.