पोटावर वाढलेला चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ
हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी जेवण केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी डाएट फॉलो केला जातो. डाएट फॉलो करून आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. शरीरात वाढलेल्या लठ्ठपणनामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. कोणतेही स्लिव्हलेस कपडे परिधान करताना खूप जास्त विचार करावा लागतो. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करताना लिंबाच्या रसाचे आहारात सेवन करावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. ग्रीन टी बनवल्यानंतर त्यात दोन किंवा तीन थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.उपाशी पोटी नियमित या पेयाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स घटक शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. लिंबामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
पुदिन्याची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. ग्रीन टी बनवतं त्यात पुदिन्याची पाने टाकून उकळवून घ्यावी. या पेयाचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यासोबतच अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होईल. पुदिन्याच्या चहामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी मध्ये बर्फ मिक्स करून प्यावा. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. अनेकांना गरम ग्रीन टी प्यायला आवडत नाही. अशावेळी ग्रीन टी मध्ये बर्फ टाकला जातो. बर्फ टाकून ग्रीन टी चे सेवन केले जाते. ग्रीन टी शरीर हायड्रेट ठेवते.शरीरात वाढलेली उष्णता कमी करून आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन केल्यास भूक नियंत्रणात राहते आणि लवकर भूक लागत नाही.
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
आहारात कर्बोदके कमी करा, प्रथिने अधिक खा आणि फायबरयुक्त पदार्थ निवडा. चांगली झोप घेणे हे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोनदा स्नायूंच्या बळकटीसाठी व्यायाम करा.
वजन कमी करण्याचे फायदे काय आहेत?
वजन कमी केल्याने दीर्घकालीन आरोग्यात सुधारणा होते आणि आरोग्य सुधारते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
वजन कमी करण्याच्या यशस्वी धोरणांचा वापर करावा, जसे की सतत व्यायाम करणे आणि आहारात बदल करणे, यामुळे ते नियंत्रित ठेवण्यास मदत होते.