फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Afghanistan Cricket Board)
आशिया कपच्या आधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई या देशांचा जोरदार सराव सुरु आहे. या तीनही देशांमध्ये ट्राय सिरीज खेळवली जात आहे, त्यामुळे सध्या या तीनही देशांची चर्चा सध्या होत आहे. आतापर्यत तीन सामने खेळवले गेले आहेत. इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानने यूएईचा ३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने २० षटकांत ४ गडी गमावून १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यूएई संघ निर्धारित षटकांत ८ गडी गमावून केवळ १५० धावाच करू शकला.
टॉस हरून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुहम्मद रोहिद खानने सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. गुरबाजने ११ चेंडूंचा सामना केला आणि ७ धावा केल्या. यानंतर इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.
Afghanistan Beat the UAE to Register 1st Tri-Nation Series Victory@IZadran18 (63) and Sediqullah Atal (54) both scored half-centuries, while @rashidkhan_19 (3/21) and @sharafuddinAS (3/24) delivered standout performances with the ball to lead AfghanAtalan to a comprehensive… pic.twitter.com/v3XBv0KZEW
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 1, 2025
सगीर खानने ही भागीदारी मोडली. त्याने अर्धशतक झळकावणाऱ्या अटलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अटलने ४० चेंडूत ५४ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या दरविश रसूलीला फक्त १० धावा करता आल्या. त्याने ७ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकार मारला. १८ व्या षटकात इब्राहिम झदरान झेलबाद झाला. झदरानने ४० चेंडूत ६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले.
अजमतुल्ला उमरझाई २० धावा करून नाबाद राहिला आणि करीम जनत २३ धावा करून नाबाद राहिला. मुहम्मद रोहिद खान आणि सगीर खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. १८९ धावांचा पाठलाग करताना युएईची सुरुवात फारशी चांगली नव्हती. मुहम्मद जोहैब स्वस्तात बाद झाला. त्याने ७ चेंडूत ७ धावा केल्या. इथन डिसूझाने १२ धावा केल्या. कर्णधार मुहम्मद वसीमने ३७ चेंडूत ६७ धावा केल्या. आसिफ खानने १ धाव केली.
हर्षित कौशिकने ४, ध्रुव पराशरने १ आणि सगीर खानने आपले खाते उघडले नाही. हैदर अलीने २ धावा केल्या. यष्टीरक्षक राहुल चोप्रा ५२ धावा करून नाबाद राहिला. शराफुद्दीन अश्रफ आणि कर्णधार रशीद खान यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. फजल हक फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.