वेलिंग्टन : तुर्की आणि सीरियानंतर (Turkey Syria Earthquake) आता न्यूझीलंडमध्येही (Earthquake in New Zealand) मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार, 15 फेब्रुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट (Lower Hutt) येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu — ANI (@ANI) February 15, 2023
न्यूझीलंडमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के वेलिंग्टन येथील दोन बेटांवर जाणवले आहेत. भूकंपाची सुरुवात एका मोठ्या धक्क्याने झाली आणि त्यानंतर कमीत कमी 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे हलके झटके जाणवले. हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस 50 किमी अंतरावर झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र 57.4 किलोमीटर खोल होते. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली जात आहे.
अनेक भागांत जाणवले भूकंपाचे धक्के
न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के हे लोअर हट (Lower Hutt), वेलिंग्टन (Wellington), वांगानुई (Whanganui), वेव्हरले (Waverley), पामरस्टन नॉर्थ (Palmerston North), फील्डिंग (Feilding), पिक्टन (Picton), एकेताहुना (Eketahuna), मास्टरटन (Masterton), मार्टिनबरो (Martinborough), पॅरापरामु (Paraparaumu), लेविन (Levin), पोरिरुआ (Porirua), फ्रेंच पास (French Pass), अप्पर हट (Upper Hutt) यासह इतर काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.