कोलंबो : श्रीलंका (Sri Lanka) सध्या अभूतपूर्व महागाईच्या (Unprecedented Inflation) खाईतून जात आहे. त्यामुळे सामान्य जनता अक्षरश: मेटाकुटीला आली असून अनेक जण देश सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, काही नागरिक जवळच्या भारताचा आसरा (Migration In India) घेत असल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी दोन कुटुंबातील आठ जण मुलांसह आढळून आले आहेत.
या अगोदर भारतीय समुद्री हद्दीत घुसणाऱ्या तब्बल १०५ जणांना ताब्यात घेतले आहे. श्रीलंका आर्थिक संकटात (Financial Crisis) सापडला आहे, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हे नागरिक देश सोडत आहेत. मंगळवारी स्थानिक मच्छिमारांनी (Fishermen) श्रीलंकेहून बोटीने आलेल्या काही नागरिकांना अरिचलमुनई येथे पाहिले. याबाबत त्यांनी सागरी पोलिसांना (Marine Police) माहिती दिली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी धनुषकोडी येथे आणले. त्यानंतर त्यांना मंडपम (Mandapam) येथील निर्वासित छावणीत (Refugee Camp) पाठवले जाणार असल्याचे सांगितले. तसेच, सदर आठ जण श्रीलंकेतील जाफना येथील आहेत. यापैकी एक जण लव्हेंद्रन यांनी सांगितले की, त्यांचा देश एक अभूतपूर्व खाईतून जात आहे. बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडल्याने जगणे कठीण झाल्याची माहिती त्याने दिली.