FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण, सौजन्य : आयएएनएस
फ्लायदुबईच्या फ्लाइट एफझेड 1073 वर आलेला धोका टाळण्याबाबत कॅप्टन मच्छारच्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. या घटनेदरम्यान को-पायलटने कॅप्टन मच्छारवर जीवघेणा हल्ला केला होता, ज्यामुळे विमान अचानक खाली कोसळू लागला. रक्तबंबाळ अवस्थेत भारतीय पायलटने हल्लेखोराचा साहसाने सामना केला आणि कॉकपिटचा दरवाजा खोलला. ज्यानंतर प्रवाशी त्यांच्या मदतीसाठी धावले व कॉकपिटमध्ये घुसून त्यांनी हल्लेखोरावर नियंत्रण मिळवले.
हल्लेखोराला प्रवाशांनी पकडल्यानंतर गंभीर रुपात जखणी असलेल्या भारतीय पायलट स्मित यांनी विमान सावरण्याचा प्रयत्न केला. कसं बसं त्यांनी हे विमान सौदी अरबमध्ये तातडीने खाली उतरवले. या घटनेवर भारतातील श्रीलंकेतील उच्चायुक्त महिशिनी कोलोन यांनी प्रवाशी व क्रू मेंबरचे प्राण वाचवल्याबाबत भारतीय पायलटचे असाधारण साहस आणि विवेकबुद्धीचे कौतुक केले. ॉ
कोलोन यांनी एक्सवर लिहिले की, धोक्याच्या वातावरणार असाधारण साहस आमि विवेकबुद्धी दाखवण्यासाठी कॅप्टन स्मित मच्छार यांना सलाम. गंभीर रुपात जखणी असतानाही त्यांनी आपल्या देखरेखीत उपस्थित लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अद्भूत संयम व दृढ संकल्पासह काम केले. त्यांचे साहस व इतर प्रवाशी आणि क्रू मेंबरच्या बहादुरीमुळे एका भयानक घटनेला टाळता आले. स्मित लवकरच बरे होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
भारतीय पायलटला ‘खरे हिरो’ असल्याचे वर्तवत संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी ही एक्सवर एक पोस्ट लिहिली. ज्यात ते म्हणतात की, कॅप्टर स्मित मच्छार लवकर बरे व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना. जो भारतीय पायलट बहादुरीने लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लढत राहिला, तरी देखील त्याच्यावर वारंवार हल्ले होत, ते पूर्णपणे गंभीर जखमी झाले. कॅप्टन मच्छार, तुम्ही एक खरे हिरो आहात. इस्त्रायल आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.
तसेच भारतातील अर्जेंटीनाचे राजदूत मारियानो कॉसिनो यांनीही कॅप्टन स्मितच्या साहसाचे कौतुक केले होते. कॅप्टन स्मित भारताचे साहस व कर्तव्याच्या भावणेचा प्रतिक आहे. गंभीर जखमी असतानाही त्यांनी शेकडो निष्पाप लोकांचे प्राण वाचवले व हिरो बनले. त्यांचे साहस व आदर्श नेहमीच स्मरणात ठेवले जाईल. जगाला तुमच्यावर गर्व आहे.
दुसरीकडे, भारतातील इस्त्रायल दुतावासानेही कॅप्टनचे आभार व्यक्त केले. महत्त्वाचे म्हणजे, या विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रवाशी हे इस्रायलचे होते. दुतावासाने एक्स पोस्टमध्ये लिहिले की, हिम्मतीची कोणतीच सीमा नसते. कठिण वेळेत कॅप्ट स्मित आणि इतरांचे साहस आमच्या लोकांमधील सखोल नात्याची आठवण करून देतात. हे नाते, हिम्मत, एकजुटता व माणुसकीच्या ताकदीच्या विश्वासावर बनले आहे. स्मित यांची प्रकृती लवकरच सुधारावी ही ईश्वर चरणी प्रार्थना.






