बराक ओबामा (Barak Obama) हे जगभरात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि एक उत्तम राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र बाराक ओबामा यांना कलेची लिखाणाची देखील प्रचंड आवड असून त्यांना ‘अवर ग्रेट नॅशनल पार्क्स’ या डॉक्युमेंटरी मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट कथाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामां यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या ‘एमी पुरस्कार’ (Emmy Awards) पुरस्कार जिंकला आहे.
‘अवर ग्रेट नॅशनल पार्क्स’ या डॉक्युमेंटरी ही जगभरातील राष्ट्रीय पार्क संदर्भात नेटफ्लिक्सवर माहितीपटाची पाच भागात सिरीज त्यांनी बनवली आहे. ओबामा हे एमी पुरस्कार जिंकणारे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी डेव्हिड अॅटनबरो, लुपिता न्योंग’ओ आणि करीम अब्दुल-जब्बार यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर याअगोदर त्यांनी ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी हे पुरस्कार जिंकले आहेत. दरम्यान, त्यांनी २०१७ मध्ये पद सोडल्यानंतर त्यांनी नेटफ्लिक्सशी करार केला होता. त्यानंतर त्यांनी या कामाला सुरूवात केली होती.
बराक ओबामा यांनी याआधी “द ऑडेसिटी ऑफ होप” आणि “ड्रीम्स फ्रॉम माय फादर” च्या ऑडिओसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. त्यानंतर आता एमी पुरस्कारावर त्यांनी मोहोर उमटवली आहे. तर एमी पुरस्कार जिंकणारे ड्वाइट आयझेनहॉवर हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्स आयोजित करणारे पहिले अध्यक्ष बनल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होती.