Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

G-20 Summit News : जागतिक स्तरावर एक नवे त्रिकुट तयार झाले आहे. तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासासाठी भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने युती तयार केली आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपच्या जागतिक वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 10:30 AM
G-20 Summit India-Australia-Canada

G-20 Summit India-Australia-Canada

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-कॅनडा-ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
  • तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासासाठी तिहेरी युती
  • जागतिक तंत्रज्ञान समीकरणात मोठा बदल
PM Modi in G-20 Summit : जोहान्सबर्ग :  सध्या दक्षिण आफ्रिकेत 2025 च्या G-20 परिषद सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित राहिले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात जागतिक समीकरणात मोठा बदल झाला आहे. भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया असे टेक त्रिकुट तयार झाले आहे. या तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेच्या विकासासाठी भागीदारीची घोषणा केली आहे. ही भागीदारी अमेरिका आणि युरोपला हादरवून टाकणार आहेत.

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

काय आहे ACITI भागीदारी?

शनिवारी (२२ नोव्हेंबर) पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान कॅनडाचे (Canada) पंतप्रधान मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेवर ACITI भागीदारीची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत तीन खंड आणि तीन महासागरांमध्ये लोकशाही सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश आहे.

या उपक्रमाअंतर्गत तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्रीकरण, AI च्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर, तसेच हरित उर्जा विकासाला गती देण्यावर आणि पुरवठा साखळीत विविधता आणण्यावर भर दिला जाणार आहे. या भागीदारीमुळे भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात सुरक्षितता, विश्वासार्हता वाढले असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. नव्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी हे त्रिकुट एकत्र आले आहे.

या नेत्यांचीही घेतली पंतप्रधान मोदींनी भेट

याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्टारमर यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचे म्हटले. भारत आणि ब्रिटनमधील वाढत्या भागीदारीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. तसेच शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञा आणि हवामान बदल यांसारख्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी देखील हवामान बदल, जागतिक शांतता आणि जागाच्या शाश्वत विकासावर चर्चा केली.

A new trilateral technology and innovation partnership! Had an excellent meeting with Mr. Anthony Albanese, PM of Australia and Mr. Mark Carney, PM of Canada on the sidelines of the G20 Summit in Johannesburg. We are delighted to announce an Australia-Canada-India Technology and… pic.twitter.com/Qa5lSvlIb2 — Narendra Modi (@narendramodi) November 22, 2025

दरम्यान पंतप्रधान मोदींनी G-20 च्या दुसऱ्या सत्रात परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका खंडाच्या विकासाला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी ड्रग्ज आणि दहशतनादाविरोधी एकतेचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाने कशाची घोषणा केली आहे?

    Ans: भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाने ACITI भागीदारीची मोठी घोषणा केली आहे.

  • Que: काय आहे भारत, कॅनडा, आणि ऑस्ट्रेलियाची ACITI भागीदारी?

    Ans: या ACITI उपक्रमाअंतर्गत भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलियात तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्रीकरण, AI च्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर, तसेच हरित उर्जा विकासाला गती देण्यावर आणि पुरवठा साखळीत विविधता आणण्यावर भर दिला जाणार आहे.

Web Title: G20 summit new trilateral technology and innovation partnershi in india australia canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • Australia
  • Canada
  • G-20 Summit
  • World news

संबंधित बातम्या

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव
1

‘आता बदलाची वेळ…’ ; G-20 मधून पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश; जागतिक विकासासाठी मांडले तीन प्रस्ताव

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?
2

Ukraine Peace Plan नाकारताच संतापले ट्रम्प; दिला अल्टीमेटम, आता काय करणार झेलेन्स्की?

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?
3

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?
4

ब्राझीलमध्ये राजकीय गोंधळ! माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना अटक, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.