Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलच्या हल्ल्यांनी मध्यपूर्वेत नवे संकटवर्तुळ! गाझा, लेबनॉन, सीरिया नंतर आता ‘या’ चौथ्या देशावर प्राणघातक हल्ला

इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 24, 2025 | 09:00 PM
Gaza, Lebanon Syria and now Yemen Israel launches deadly attack on fourth country

Gaza, Lebanon Syria and now Yemen Israel launches deadly attack on fourth country

Follow Us
Close
Follow Us:

Israel strikes Yemen today : मध्यपूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. इस्रायलने रविवारी (२४ ऑगस्ट) येमेनची राजधानी साना येथे प्राणघातक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत राष्ट्रपती भवनाजवळील ठिकाणे तसेच क्षेपणास्त्र तळ लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वृत्तांनुसार, स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. हा हल्ला हुथी बंडखोरांनी इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्राच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हे क्षेपणास्त्र क्लस्टर वॉरहेडसह डागण्यात आले होते, आणि हुथी बंडखोरांनी इस्रायलविरुद्ध या प्रकारचे शस्त्र प्रथमच वापरले आहे.

युद्धाचा विस्तार: गाझापासून येमेनपर्यंत

७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामध्ये सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धानंतर मध्यपूर्वेत अस्थिरता वाढली आहे. सुरुवातीला संघर्ष गाझापर्यंत सीमित होता. मात्र, पुढील काही महिन्यांत इस्रायलने लेबनॉन, सीरिया आणि आता येमेनवरही हल्ले केले. यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे पुढचा देश कोण? काही सूत्रांचे मत आहे की आता इस्रायलचे खरे लक्ष्य इराण असू शकते. कारण सप्टेंबर महिन्यात अनेक पाश्चात्त्य देश पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याचा विचार करत आहेत, आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel News : पंबनपासून दार्जिलिंगपर्यंत… ‘हे’ आहेत भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग

साना आणि होदेइदाहमध्ये भीषण स्फोट

रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर साना शहरात भीषण स्फोटांचे आवाज घुमले. एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलने फक्त राष्ट्रपती भवनाजवळील जागाच नव्हे, तर नगरपालिकेची इमारत आणि क्षेपणास्त्र तळही उडवून दिली. त्याचबरोबर, महत्वाच्या बंदर शहर होदेइदाह येथेही हवाई हल्ले झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकांचे जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

हुथींचे इस्रायलविरोधी हल्ले

हुथी बंडखोर गेल्या दोन वर्षांपासून इस्रायलविरोधी कारवाया करत आहेत.

  • त्यांनी वारंवार इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली आहेत.
  • पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हे हल्ले सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे.
  • नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान त्यांनी १०० पेक्षा जास्त व्यापारी जहाजांना लक्ष्य केले.

यामुळे लाल समुद्रातील व्यापारमार्ग असुरक्षित बनला आहे. हा मार्ग दरवर्षी तब्बल १ ट्रिलियन डॉलर्सच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरला जातो.

अमेरिकेची भूमिकाही चर्चेत

या परिस्थितीत अमेरिका देखील थेट गुंतलेली आहे.

  • ट्रम्प प्रशासनाच्या काळात हुथी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात जोरदार हवाई हल्ले झाले.
  • यंदाच्या मे महिन्यात, अमेरिकेने हुथींशी करार करून जहाजांवरील हल्ले थांबवण्याच्या बदल्यात हवाई हल्ले थांबवले.
  • मात्र हुथींच्या म्हणण्यानुसार, हा करार त्यांना इस्रायलशी संबंधित लक्ष्यांवर हल्ला करण्यापासून रोखत नाही.

पुढचा टप्पा – इराणशी युद्ध?

विशेषज्ञांच्या मते, इस्रायलच्या या कारवाया केवळ तात्पुरत्या प्रत्युत्तरापुरत्या नाहीत, तर यामागे एक मोठा धोरणात्मक डाव आहे. पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय मान्यता न मिळावी, यासाठी इस्रायल कदाचित इराणविरुद्ध थेट युद्धाची तयारी करत आहे. येमेनवरील हल्ल्यानंतर ही भीती आणखी दृढ झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : समुद्राच्या मिठीतील अजरामर वास्तू…महाराष्ट्रातील ‘ते’ जलदुर्ग जे आजही आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार

जागतिक स्थैर्य आणि व्यापारमार्गांनाही धोका

गाझापासून सुरू झालेला संघर्ष आता लेबनॉन, सीरिया ओलांडून येमेनपर्यंत पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील हा संघर्ष केवळ प्रादेशिक राहिला नाही, तर आता तो जागतिक स्थैर्य आणि व्यापारमार्गांनाही धोक्यात घालत आहे. पुढील काळात इराणवर थेट हल्ला झाल्यास, हा संघर्ष जगभरात नवा तणाव निर्माण करू शकतो.

Web Title: Gaz lebanon syria and now yemen israel launches deadly attack on fourth country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • Israel Attack
  • Israel War
  • yemen

संबंधित बातम्या

मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट! लेबनाॅनवरील हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुखाचा खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा
1

मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट! लेबनाॅनवरील हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुखाचा खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा

Hamas Terror Network: युरोपवर दहशतीचे सावट; हमासचे गुप्त टेरर नेटवर्क सक्रिय, ‘Mossad’ने दिली वॉर्निंग
2

Hamas Terror Network: युरोपवर दहशतीचे सावट; हमासचे गुप्त टेरर नेटवर्क सक्रिय, ‘Mossad’ने दिली वॉर्निंग

Trade Deal : भारत-इस्रायल व्यापाराला गती! 6 अब्ज डॉलरचा व्यापार वाढणार; FTA कराराने उघडल्या नव्या संधी
3

Trade Deal : भारत-इस्रायल व्यापाराला गती! 6 अब्ज डॉलरचा व्यापार वाढणार; FTA कराराने उघडल्या नव्या संधी

Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL
4

Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.