पांबनपासून दार्जिलिंगपर्यंत... 'हे' आहेत भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Dangerous railway routes India : भारताची रेल्वे व्यवस्था ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी गाड्यांमधून प्रवास करतात आणि स्वस्त, सोयीस्कर व विश्वासार्ह वाहतुकीचा आनंद घेतात. रेल्वे ही खरं तर देशाची जीवनरेखा आहे. मात्र, या जीवनरेखेत काही असे मार्ग आहेत की जिथे निसर्गाची अद्भुत किमया आणि भव्य दृश्यांचा अनुभव घेता येतो, पण त्याचबरोबर अपघातांचा कायमचा धोका डोक्यावर घोंगावत असतो. चला तर जाणून घेऊया अशा भारतातील पाच रेल्वे मार्गांविषयी, जे एकीकडे सुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध आहेत, तर दुसरीकडे अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरले आहेत.
ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील डोंगराळ आणि जंगली भागातून जाणारा हा मार्ग प्रवाशांसाठी रोमांचकारी असला, तरी धोका कमी नाही. या ट्रॅकवर नक्षलवादी कारवाया, रुळांवर मोठे दगड पडणे, तर कधी मालगाड्या रुळावरून घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांना जरी हिरवाईने नटलेला डोंगराळ नजारा मोहवून टाकतो, तरी असुरक्षिततेची छाया नेहमीच कायम राहते.
हे देखील वाचा : 5 smallest countries : ‘हे’ आहेत जगातील 5 सर्वात लहान देश; एका दिवसात करता येईल संपूर्ण सफर
हिमाचल प्रदेशातील ९६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. डोंगराळ वळणे, शेकडो पूल आणि बोगद्यांतून जाणारी ही रेल्वे स्वतःमध्ये एक पर्यटन आकर्षण आहे. मात्र पावसाळ्यातील भूस्खलन, निसरड्या पायवाटा आणि जुन्या पुलांवर साचलेले पाणी हे अपघातांचे मोठे कारण ठरते. प्रवास नयनरम्य असला तरी धोका कायम राहतो.
दार्जिलिंगची ऐतिहासिक “टॉय ट्रेन” हे जगभरातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. पर्वतरांगांमधून जाताना डोंगर, धुके आणि चहा मळ्यांचे दृश्य मंत्रमुग्ध करते. परंतु या ट्रॅकच्या अगदी शेजारी रस्ता असल्याने रेल्वे आणि वाहनांमध्ये टक्कर होण्याचा धोका नेहमी असतो. दाट धुक्यामुळे दृश्य अस्पष्ट होणे, हेही अपघातांचे प्रमुख कारण मानले जाते.
दक्षिण भारतातील हा रेल्वे मार्ग हिरव्यागार जंगलातून आणि उंच पर्वतरांगांतून जातो. याला “ब्ल्यू माउंटन रेल्वे” असेही म्हणतात. प्रवास जरी अप्रतिम असला तरी उंच उतार, वळणदार रुळं आणि जीर्ण ट्रॅक हे अपघातांसाठी कारणीभूत ठरतात. अनेकदा डबे घसरून खाली जाण्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे या मार्गाला धोकादायक ठपका लागला आहे.
भारतातील सर्वात रोमांचकारी रेल्वे प्रवास म्हटला तर तो म्हणजे पांबन पूलावरून जाणारा मार्ग. हिंदी महासागरावर बांधलेला हा पूल आजही अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. मात्र, वादळी पाऊस, उंच भरती, समुद्रावरून वाहणारे जोरदार वारे आणि ट्रॅकवर साचणारे पाणी हे घटक पूलाला धोकादायक बनवतात. समुद्रावरून जाणारी ट्रेन पाहणे नक्कीच अद्वितीय अनुभव आहे, पण त्यामध्ये साहसाइतकाच धोका दडलेला आहे.
हे देखील वाचा : Bom Jesus : 500 वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडलं; नामिबियाच्या वाळवंटात ‘बॉम जीझस’ जहाजाचा अब्जावधींचा खजिना सापडला
या सर्व मार्गांवरील अपघातांची कारणे जवळजवळ सारखीच आहेत –
जुने व जीर्ण ट्रॅक आणि पायाभूत सुविधा
तांत्रिक बिघाड
मुसळधार पाऊस व भूस्खलन
मानवी निष्काळजीपणा
नक्षलवादी किंवा अन्य बाह्य अडथळे
या मार्गांवर प्रवास करताना प्रवाशांनी हवामानाचा अंदाज, रेल्वेच्या सुरक्षा सूचना आणि स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन अवश्य पाळावे. रेल्वे प्रशासनानेही वेळोवेळी ट्रॅक तपासणी, डब्यांची दुरुस्ती आणि आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. कारण प्रवास जितका सुंदर आणि संस्मरणीय असावा तितकाच तो सुरक्षितही असला पाहिजे.