Gaza sliding into Civil War
Gaza News in Marathi : तेल अवीव : अमेरिकेच्या (America) मध्यस्थीने गाझामध्ये इस्रायल आणि हमास युद्ध (Israel Hamas War) संपले आहे. इस्रायली सैन्याने हल्ले थांबवले असून सैन्य माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पण आता गाझामध्ये एक नवे संकट उभे राहिले आहे. गाझात आता गृहयुद्धाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
सोमवारी (१३ ऑक्टोबर) रोजी हमासच्या सैन्यात आणि प्रतिस्पर्धी जमातींमध्ये २० हून अधिक लोक ठार झाले आहे. हमासने अचानक आठ गाझा रहिवाशांची हत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली. हमासने आरोप केला की, या लोकांनी इस्रायलसाठी त्यांच्याविरोधात हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून ठाप करण्यात आले. यामुळे गाझामध्ये आता अंतर्गत लढाईचा धोका निर्माण झाले आहे. लोकांनी हमासच्या या कारवाईला विरोध केला आहे.
द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हमास गाझातील लोकांना त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या हत्यांमधून हमासला गाझा रहिवाशांना, त्यांची सत्ता अजूनही असल्याचा संदेश द्यायचा आहे, असे सांगितले जात आहे. यामुळे गाझामध्ये नवीन हिंसाचाराची लाट उफाळली आहे.
द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हमासचे सैन्य गाझात शस्त्र घेऊन फिरत आहेत. लोकांना अडवून त्यांची ओळख पटवून त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहे. नुकतेच हमासने गाझातील दुघमुश जमातीवर हल्ला केला होता. यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते.
हमास आणि दुघमुश संघर्षामुळे गृहयुद्धाची भीती निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गाझात एका २१ वर्षीय तरुण नेता मुहम्मद अल-मंशी यांनी हमासविरोधी भूमिका घेतली. त्याने हमास त्यांच्यावर सतत हल्ला करत असल्याचे म्हटले. हमास त्यांच्या विरोधात जाणाऱ्या जमातींना लक्ष्य करत असल्याचे म्हटले. यावरुन हमास आपल्या बळाचा वापर करुन गाझात आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.
पॅलेस्टिनी समाजात अनेक पोटजाती आहे. या जमातींनी पॅलेस्टिनी राजकारणात आपली भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. गाझाती सर्वा मोठी आणि मजबूत जमात म्हणजे दुमघुश आहे. ही जमात सध्या हमासविरोधी भूमिका घेत आहे. तसेच गाझाच्या खान युनूस शहरात अल-मजयदा जमातींचे वर्चस्व आहे. या जमातींनी हमासविरोधी भूमिका स्वीकारली आहे.
प्रश्न १. गाझावर आता कोणते नवे संकट उभे राहिले आहे?
गाझावर आता गृहयुद्धाचे नवे संकट उभे राहिले आहे.
प्रश्न २. गाझात पुन्हा कोणामध्ये झाला संघर्ष?
गाझामध्ये हमास आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी जमात दुमघुशमध्ये सोमवारी (१३ ऑक्टोबर) तीव्र संघर्ष झाला.
प्रश्न ३. इस्रायल-हमास युद्धाची काय परिस्थिती आहे?
इस्रायल आणि हमासमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली असून इस्रायलने गाझातील हल्ले थांबवले आहेत.
Pak-Afghan War : पाकिस्तानला तालिबानकडून बसली चपराक; तोंडघशी पडलेल्या पाकचे भारतावर बिनबुडाचे आरोप