पुतिनच्या भारत दौऱ्याने बदलणार आंतरराष्ट्रीय समीकरण? रशियन राजदूतांनी स्पष्टच सांगितला 'सिक्रिट अजेंडा' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Vladimir Putin to Visit India Soon : नवी दिल्ली/मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, येत्या डिसेंबर महिन्यात ५ ते ६ डिसेंबरला पुतिन भारतात येऊ शकतात. यावेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासोबत एक वार्षिक बैठक होणार आहे. भारत आणि रशिया संबंधासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ब्रिटनची रशियाविरोधात मोठी कारवाई; ‘या’ तेल कपंन्यांवर लादले निर्बंध, भारतावर होणार परिणाम?
शिवाय नुकतेच रशियाकडून तेल खरेदीमुळे भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताने रशियाकडू तेल खरेदी बंद करावी यावर ठाम भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासनही दिले असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खलबळ उडाली आहे.
याच वेळी पुतिन यांच्या भारत दौऱ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच भारतातील रशियन राजदूत डेनिस ओलिपोव्ह यांनी देखील पुतिन यांच्या भारत भेटीची जोरदार तयारी सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी पुतिन यांचा भारत भेटीचा अजेंडाही उघड केला आहे.
#WATCH | Delhi: On Russian President Vladimir Putin’s visit to India, Russian Ambassador to India, Denis Alipov, says, “… The preparations are ongoing very intensively. We have a very comprehensive agenda ahead of us. The visit will be very important. In this sense, we are at… pic.twitter.com/wyc7bPNN1b — ANI (@ANI) October 16, 2025
भारतातील रशियन राजदूत डेनिस ओलिपोव्ह यांनी म्हटले की, पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तयारी वेगाने सुरु आहे. या दौऱ्याचा हेतू अगदी व्यापक असून ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि रशियामध्ये अर्थव्यवस्था, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात करार अंतिम टप्प्यात असून त्यावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. मला आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस रशियन राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा होईल, जो यशस्वी आणि निर्णयाक असेल.
रशियन राजदूत डेनिस ओलिपोव्ह यांच्या विधानावरुन स्पष्ट होते की, भारत आणि रशियामध्ये अनेक करार अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही देश चांगले व्यापारी भागीदार आहे. शिवाय भारत गेल्या अनेक काळापासून रशियाकडून तेल खरेदी करत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली आहे.
ओलिपोव्ह यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला आहे. परंतु ओलिपोव्ह यांच्या विधानावरुन भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय संबंध चांगले असल्याचे आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद न केल्याचे स्पष्ट होते.
प्रश्न १. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर कधी येणार आहेत?
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन येत्या डिसेंबर महिन्यात ५ ते ६ डिसेंबरला पुतिन भारतात येऊ शकतात.
प्रश्न २. काय आहे पुतिन यांच्या भारत भेटीचा अजेंडा?
रशियन राजदूत डेनिस ओलिपोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाच्या वाढत्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या दौऱ्याचा अजेंडा पूर्वनियोजित आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट करणाऱ्यावर या दौऱ्यात लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी…