Photo Credit- Social Media सुनीता विल्यम्स आलेल्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची किती आहे किंमत
Dragon Crew Capsule Cost: सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि निक हेग पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी ६ जून २०२४ रोजी आंतराळ स्थानकाकडे उड्डाण केले होते. तर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि निक हेग २९ सप्टेंबर २०२४ रोजी स्टेशनवर पोहोचले. ९ महिने अडकलेली सुनीता विल्यम्स आता पृथ्वीवर परतली आहे. त्या सर्वांना एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलने पृथ्वीवर आणण्यात आले. हे कॅप्सूल आतापर्यंत ४९ वेळा प्रक्षेपित करण्यात आले आहे. ड्रॅगन कॅप्सूलने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ४४ वेळा प्रवास केला आहे. पण तुम्हाला त्याची किंमत माहित आहे का?
चारही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची निवड केली आहे. या कॅप्सूलमध्ये एका वेळी सात अंतराळवीर बसू शकतात. हे जगातील पहिले खाजगी विमान आहे, जे अवकाश स्थानकावर सतत माल वाहून नेत आहे. या रिकाम्या कॅप्सूलचे वजन ७७०० किलो आहे. जेव्हा हे कार्गो आणि अंतराळवीरांसह प्रक्षेपित केले जाते तेव्हा त्याचे कमाल वजन १२,५०० किलोग्रॅमपर्यंत पोहोचते. साधारणपणे दोन ते चार अंतराळवीर या कॅप्सूलमध्ये बसू शकतात, परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्यात सात लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.
Sunita Williams Husband: कोण आहे सुनीता विल्यम्सचे पति
स्पेसएक्सने अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे साहजिकच खर्चही त्यांनीच उचलला. स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूल आणि फाल्कन ९ रॉकेटचा वापर करून त्यांना पृथ्वीवर आणण्यात आले. अशा परिस्थितीत, फाल्कन ९ चा प्रक्षेपण खर्च ५८० कोटी रुपये (६९.७५ दशलक्ष डॉलर्स) आहे तर क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा खर्च ११७० कोटी रुपये म्हणजेच १४० दशलक्ष डॉलर्स आहे. रिपोर्ट्सनुसार, स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाच्या प्रति सीटची किंमत सुमारे $55 दशलक्ष (सुमारे 45 अब्ज रुपये) आहे.
एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स त्यांचे रॉकेट आणि कॅप्सूल पुन्हा वापरते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते. पण यावेळी ते एक आपत्कालीन मोहीम प्रक्षेपित करण्यात आले होते. ज्यात ४ लोकांचा जिवाला धोका होता, त्यामुळे सुरक्षितता आणि अतिरिक्त सुविधांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली. म्हणूनच यावेळी या मोहिमेवर जास्त खर्च झाला आहे. क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा वापर विशेषतः लोकांना अंतराळातून आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी केला जातो, म्हणूनच त्यात बॅकअप सिस्टम, लाईफ सपोर्ट सिस्टम, आपत्कालीन निर्वासन प्रणाली आहे, म्हणूनच त्याची किंमत वाढते.