Sunita Williams Husband: कोण आहे सुनीता विल्यम्सचे पति? कधीच आला नाही प्रकाशझोतात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्य्म्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 19 मार्च 2025 रोजी 9 महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. गेल्या वर्षी 5 जून ला दोन्ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एका मोहिमेसाठी उड्डाण केले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांची होती, मात्र बोईंग स्टारलाइनर कॅप्सूलच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांना 9 महिने अंतराळात रहावे लागले.
सध्या सुनूता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. संपूर्ण जग त्यांच्या सुखरुप घरी परतण्याचा आनंद साजरा करत आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील आनंदी आहे. सुनीता विल्यम्स यांचा नवरा मायकल जे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. खरंतरं मायकल जे यांनीही सुनीता विल्यम्स यांच्या मोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मायकल जे सुनीता विल्यम्स सारखे सतत चर्चेत राहत नाही, मात्र सुनीता विल्यम्स आणि मायकल जे. यांची लव्ह स्टोरी अगदी एखाद्या चित्रपटासारखीच आहे.
कोण आहे मायकल जे?
सुनीता विल्यम्स यांची ओळख जगभरात आहे पण त्यांचे पति मायकेल जे यांची देखील एक वेगळी ओळख आहे. मायकले जे युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ लॉ एन्फोर्समेंटमध्ये यूएस मार्शल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून देखील कामकाज केले आहे.
सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ कारकिर्दित मायकल यांचे प्रशिक्षण उपयुक्त ठरले आहे. मायकल यांनी नेहमीच सुनीता विल्यम्सच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या धेय्याबद्दल जागरुकरता ठेवली आहे. मायकल यांनी प्रसिद्धपासून दूर राहण्यास आवडते मात्र, त्यांनी सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमांमध्ये आपले योगदान दिले आहे.
अशी झाली मायकल जे. आणि सुनीता विल्यम्स यांची भेट
1987 मध्ये अमेरिकेतील मेरीलॅंडमधील अॅनापोलिस येथील नेव्हल अकादमीमध्ये सुनीता विल्यम्स आणि मायकल जे यांची पहिली भेट झाली. या ठिकाणी दोघेही आपले प्रशिक्षण घेत होते. सुनीता विल्यम्स नैदलात सेवा देण्याची तयारी करत होत्या तर मायकल जे. हेलिकॉप्टर पायलट साठी तयारी करत होते.
सुनीता विल्यम्स नैौदलात वैमानिक म्हणूनही होत्या. यावेळी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि काही वर्षानंतर दोघांनी लग्न केले. आजही हे जोडपे एकमेकांना साथ देत आहेत.
हिंदू धर्माबाबत आस्था
मायकल जे. विल्यम्स हिंदू धर्म स्वाकरला आहे. ते मूळत: हिंदू धर्माचे अनुयायी नव्हते, मात्र सुनीता विल्यम्स यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. सुनीता आणि मायकल दोघेही आध्यात्मिक असून एकमेकांच्या आध्यात्मिक प्रवासाचा आदर करतात. सुनीता विल्यम्स यांना कोणतेही आपत्य नाही.
त्यांनी पाळीव प्राणी खूप आव़डतात. त्यांच्याकडे एकेकाळी गोर्बी नावाचा जॅक रसेल टेरियर होता. सध्या त्यांच्याकडे गनर, बेली आणि रोटर नावाचे आमखी तीन पाळीव प्राणी आहेत. जे त्यांच्या कुटुंबाचा भाग आहेत.