India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नाह वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चाडेर यांनी नुकत्याच अपर सुबानसिरीचे उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही मुक्तपणे फिरत असलेली आमची पूर्वजांची जमीन, जंगलातील उत्पादने गोळा करण्याची ठिकाणे आणि गुरे चारत असलेल्या जमिनीचा मोठा भाग आता चीनच्या पीएलएच्या ताब्यात गेला आहे.
अपर सुबानसिरीमधील ताकसिंग महसूल क्षेत्रातील ५ ठिकाणांमध्ये चीनने हळूहळू आपला प्रभाव वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील महत्त्वाच्या भागांवर धोरणात्मक पद्धतीने कब्जा करून चीन आपले नियंत्रण वेगाने विस्तारत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नालो यांनी या प्रकरणाची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाने या आरोपांची अधिकृत पुष्टी करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या दाव्यांबाबत चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले.
Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?






