Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-EU Summit 2026: युरोपची मोठी कबुली! ‘भारताशिवाय आमचा व्यापार चालूच शकत नाही’; प्रजासत्ताक दिनापूर्वी आनंदाची बातमी

India-EU Trade Deal: युरोपियन युनियनचे वरिष्ठ नेते भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. १६ व्या ईयू-भारत शिखर परिषदेत व्यापार, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि संशोधनात सहकार्य वाढविण्यावर आणि मुक्त व्यापार करारावर भर दिला जाईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 22, 2026 | 10:20 AM
india eu summit 2026 republic day chief guest 3 historic deals fta security mobility

india eu summit 2026 republic day chief guest 3 historic deals fta security mobility

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
  • ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (FTA)
  • ३ ऐतिहासिक करारांवर शिक्कामोर्तब

India EU Summit 2026 New Delhi : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक राजकारणातून एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनच्या (EU) परराष्ट्र धोरण प्रमुख कोया कॅलास (Kaja Kallas) यांनी युरोपियन संसदेत बोलताना भारताचे वर्णन युरोपसाठी “अपरिहार्य” (Indispensable) असे केले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून येण्यापूर्वी ईयू नेत्यांनी भारतासोबतच्या तीन महाकरारांना हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे येणारा काळ भारताच्या आर्थिक आणि सामरिक प्रगतीसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.

१. मुक्त व्यापार करार (FTA): जगातील सर्वात मोठी डील

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार आता निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी याला “मदर ऑफ ऑल डील्स” असे संबोधले आहे. या करारामुळे भारतीय कापड, चामड्याच्या वस्तू आणि कृषी उत्पादनांना युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल. तर दुसरीकडे, युरोपमधील स्वस्त तंत्रज्ञान, रसायने आणि यंत्रसामग्री भारताला मिळणार आहे. २०२६ च्या अखेरीस या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वर्षाला ३०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

२. संरक्षण आणि सुरक्षा: ‘सायबर ते सागरी’ सहकार्य

युरोपियन युनियन आणि भारत आता केवळ व्यापारी मित्र न राहता ‘सामरिक भागीदार’ बनणार आहेत. कोया कॅलास यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देश एका नवीन सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करणार आहेत. यामध्ये सागरी सुरक्षा (Indo-Pacific), सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांचा समावेश असेल. तसेच, दोन्ही देशांमध्ये गोपनीय माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी ‘सुरक्षा माहिती करार’ (SOIA) देखील केला जाणार आहे. चीनच्या वाढत्या विस्तारवादाला रोखण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

#BREAKING: EU High Representative for Foreign Affairs and Security Policy, Kaja Kallas inside EU Parliament announces that #India is becoming “indispensable” for Europe’s economic resilience. New EU-India Security and Defence Partnership to be inked next week. FTA on cards. pic.twitter.com/32raexQLKZ — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 21, 2026

credit – social media and Twitter

३. मोबिलिटी पॅक्ट: भारतीय तरुणांसाठी युरोपची दारे उघडणार

तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे ‘कम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी अँड रिसर्च फ्रेमवर्क’. या करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक, कुशल व्यावसायिक आणि हंगामी कामगारांना युरोपमध्ये जाणे आणि तिथे काम करणे अत्यंत सोपे होणार आहे. व्हिसा प्रक्रियेतील सुलभता आणि पदव्यांची परस्परांना मान्यता यामुळे भारतातील टॅलेंटला युरोपच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळेल. जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांसारख्या देशांनी यापूर्वीच अशा करारांना पाठिंबा दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा

भारताचे महत्त्व का वाढले?

युरोप सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या बदलत्या व्यापारी धोरणांमुळे (Trump Tariffs) तणावाखाली आहे. अशा स्थितीत भारतासारखा मोठा लोकशाही देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था युरोपसाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह भागीदार बनला आहे. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या १६ व्या भारत-ईयू शिखर परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक अजेंडा २०३०’ चा रोडमॅप जाहीर केला जाईल, जो पुढील दशकभरासाठी भारताला युरोपचा सर्वात जवळचा मित्र म्हणून प्रस्थापित करेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत?

    Ans: युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे आहेत.

  • Que: 'मोबिलिटी पॅक्ट'चा भारतीयांना काय फायदा होईल?

    Ans: यामुळे भारतीय विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनीअर्स आणि कुशल कामगारांना युरोपीय देशांत नोकरी आणि शिक्षणासाठी व्हिसा मिळवणे सहज शक्य होईल.

  • Que: भारत-ईयू मुक्त व्यापार कराराचे (FTA) महत्व काय?

    Ans: या करारामुळे दोन्ही देशांमधील सीमा शुल्क कमी होईल, ज्यामुळे व्यापार ५०% ने वाढेल आणि ग्राहकांना स्वस्त तंत्रज्ञान व उत्पादने मिळतील.

Web Title: India eu summit 2026 republic day chief guest 3 historic deals fta security mobility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • india
  • international news
  • Trade War

संबंधित बातम्या

Russia Ukraine War: ‘तुमचाच पैसा, तुमचीच शांती!’ अमेरिकेतील रशियन निधीतून होणार युक्रेनची पुनर्बांधणी; पुतिन यांचा मोठा डाव
1

Russia Ukraine War: ‘तुमचाच पैसा, तुमचीच शांती!’ अमेरिकेतील रशियन निधीतून होणार युक्रेनची पुनर्बांधणी; पुतिन यांचा मोठा डाव

युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल
2

युरेनियम ते हिरे…. ‘या’ देशासोबतच्या मैत्रीमुळे भारतासाठी सुरु होणार सुवर्णकाळ ; तिजोरी होणार मालामल

Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार
3

Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
4

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.