Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

Maharashtra Breaking: लोकसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं आहे. दरम्यान हे बिल मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित केलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 08:19 AM
Maharashtra Breaking News Today 01.10.2026

Maharashtra Breaking News Today 01.10.2026

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News: लोकसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं आहे. दरम्यान हे बिल मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित केलं आहे. 

Vidarbha Rain Red Alert: विदर्भाला पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Forecast:  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. या तीव्र हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः पूर्व विदर्भात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे आधीच राज्यातील खरीप हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असताना, आता या उशिरा आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तीन जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, नागपूरसह इतर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, विदर्भात पुढील दोन दिवस अतिमुसळधार ते ढगफुटीसदृश पावसाची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने खालीलप्रमाणे सतर्कतेचा इशारा जारी केला आहे:

  • रेड अलर्ट (Red Alert): चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका
  • ऑरेंज अलर्ट (Orange Alert): नागपूर, भंडारा आणि वर्धा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

 

The liveblog has ended.
  • 29 Jul 2026 06:50 PM (IST)

    29 Jul 2026 06:50 PM (IST)

    Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर....


    सुनयना सोनवणे/ पुणे: पुणे
    शहराने यंदाच्या जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद करत ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शिवाजीनगर वेधशाळेच्या नोंदीनुसार, बुधवारी (ता. २९)सकाळपर्यंत जुलै महिन्यात ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९०७ मध्ये ५०८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल ११९ वर्षांनंतर पुण्यात जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

  • 29 Jul 2026 06:40 PM (IST)

    29 Jul 2026 06:40 PM (IST)

    ‘स्किल इंडिया’मुळे घडेल ‘ब्रँड इंडिया’; Navbharat-Navarashtra Education Conclave मध्ये आशिष शेलार यांचा विश्वास

    Navbharat-Navarashtra Education Conclave 2026: मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित ‘नवभारत-नवराष्ट्र एज्युकेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये (Navbharat-Navarashtra Education Conclave 2026) महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भारताच्या युवा शक्तीला देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत, ‘स्किल इंडिया’च्या माध्यमातून ‘ब्रँड इंडिया’ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

  • 29 Jul 2026 06:30 PM (IST)

    29 Jul 2026 06:30 PM (IST)

    पोलिस गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच चालतात - राहुल गांधी

  • 29 Jul 2026 06:16 PM (IST)

    29 Jul 2026 06:16 PM (IST)

    भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत

    Team India: वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय खेळाडूने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीने आपली छाप सोडली आहे. आयपीएलमध्ये त्याने अत्यंत शानदार कामगिरी केली. तसेच झिबॅाम्बेविरुद्ध देखील आक्रमक फलंदाजी करत दोन अर्धशतके लगावली. त्यातच आता वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर वनडे संघात सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. भारतीय क्रिकेटचे माजी प्रशासक मकरंद वायंगणकर यांनी याबाबत भाष्य केले आहे.

  • 29 Jul 2026 06:01 PM (IST)

    29 Jul 2026 06:01 PM (IST)

    Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा

    Vande Mataram Bill Passed in Rajya Sabha: राज्यसभेने “राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६” मंजूर केले आहे. या सुधारणेअंतर्गत, “वंदे मातरम”च्या अपमानाशी संबंधित कायद्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल. हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर, जो कोणी जाणूनबुजून “वंदे मातरम”चा अपमान करेल किंवा राष्ट्रगीत गाण्यात अडथळा आणेल, त्याला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

  • 29 Jul 2026 05:59 PM (IST)

    29 Jul 2026 05:59 PM (IST)

    क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

    भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक रायन टॅन डोशेट यांच्या राजीनाम्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसह संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलण्यात आला. वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाला नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मिळणार आहेत. बीसीसीआयने अनुभवी प्रशिक्षक शुभदीप घोष यांची भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 29 Jul 2026 05:50 PM (IST)

    29 Jul 2026 05:50 PM (IST)

    परतूरच्या शाळेचा भोंगळ कारभार उघडा; कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार?

    विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देण्याचे सरकारी दावे कागदावरच राहत असल्याचे भीषण वास्तव परतूर येथील डॉ. झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये समोर आले आहे. शाळेतील गंभीर समस्या, सोयी-सुविधांचा अभाव आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर, गटशिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी या शाळेला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या धाडसी कारवाईत शाळेचा भोंगळ कारभार उघडा पडला असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा रीतसर पंचनामा केला आहे. त्यामुळे निष्काळजी शाळा कर्मचारी व प्रशासनाविरोधात लवकरच कडक कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

  • 29 Jul 2026 05:40 PM (IST)

    29 Jul 2026 05:40 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘या’ घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान Manmohan Singh यांना क्लीन चिट; काय होते प्रकरण?

    सर्वोच्च न्यायालयाने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना अत्यंत वादग्रस्त कोळसा खाण वाटप प्रकरणात निर्दोष ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून, २०१४ मध्ये सीबीआय विशेष न्यायालयाने जारी केलेला समन्स आदेश रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, माजी पंतप्रधानांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कोणताही ठोस आधार नव्हता. डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी, २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले.

  • 29 Jul 2026 05:25 PM (IST)

    29 Jul 2026 05:25 PM (IST)

    युद्ध चिघळले! अमेरिकेसोबत सौदी सैन्याचा इराकमध्ये मोठा बॉम्बहल्ला; इराण-समर्थित मिलिशियांचे अनेक तळ उद्ध्वस्त

    मध्य पूर्वेतील (Middle East) लष्करी संघर्ष आणि युद्धाचा तणाव आता एका नवीन आणि अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकन सैन्य आणि सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी संयुक्त लष्करी मोहीम राबवत पूर्व इराकमध्ये इराण-समर्थित मिलिशियांच्या अनेक प्रमुख तळांवर भीषण बॉम्बहल्ला केला आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील प्रांतातील अत्यंत महत्त्वाच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या धोकादायक ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही थेट कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने (USCENTCOM) स्पष्ट केले आहे. या कारवाईत इराण-समर्थित गटांचे शस्त्रास्त्र साठे, रसद केंद्रे आणि कमांड सेंटर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 29 Jul 2026 05:22 PM (IST)

    29 Jul 2026 05:22 PM (IST)

    Oil Crisis : सौदी अरब ची अरामको पूणर्पणे ठप्प

    मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या Saudi Aramco च्या जिझान रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

  • 29 Jul 2026 05:13 PM (IST)

    29 Jul 2026 05:13 PM (IST)

    MPSC पेपरफुटीवरून राजकीय संघर्ष पेटला, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कथित पेपरफुटीवरून राजकीय संघर्ष पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सोशल मीडिया पोस्टनंतर या वादाला अधिकच धार आली. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

  • 29 Jul 2026 05:09 PM (IST)

    29 Jul 2026 05:09 PM (IST)

    Middle East War: युद्ध चिघळले!

    मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि सौदी अरेबियाने इराकमधील इराण-समर्थित मिलिशियांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला आहे.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2026 05:02 PM (IST)

    29 Jul 2026 05:02 PM (IST)

    ‘आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उत्तर देऊ’

    धाराशिवमध्ये मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आनंदराज आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला इशारा देत, आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2026 04:53 PM (IST)

    29 Jul 2026 04:53 PM (IST)

    War Alert: इस्रायल अन् युक्रेन एकत्र लढणार?

    वॉशिंग्टनमध्ये झेलेन्स्की आणि नेतान्याहू यांच्या भेटीमुळे नवीन जागतिक समीकरणे निर्माण झाली आहेत. रशिया-इराण युती वाढत असताना, जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे का?

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2026 04:41 PM (IST)

    29 Jul 2026 04:41 PM (IST)

    Johnson Baby Powder: बेबी पावडरमुळे कॅन्सर?

    टॅल्कम आधारित बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोग होत असल्याच्या हजारो खटल्यांचा सामना करणाऱ्या 'जॉनसन अँड जॉनसन' या बहुराष्ट्रीय कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

     

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  • 29 Jul 2026 04:32 PM (IST)

    29 Jul 2026 04:32 PM (IST)

    Ashwini Mahangade : ‘मैं जितने आया ही नहीं,

    मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून भातलागवडीचा अनुभव घेतला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2026 04:20 PM (IST)

    29 Jul 2026 04:20 PM (IST)

    Ukraine-Iran : युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला

    कॅस्पियन समुद्रात इराणशी संबंधित जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर युक्रेन-रशिया युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्ष एकमेकांशी जोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे जागतिक तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2026 04:00 PM (IST)

    29 Jul 2026 04:00 PM (IST)

    आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

    पुणे : पुण्यासारख्या शहरात परराज्य तसेच इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असून, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक केले असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

  • 29 Jul 2026 03:55 PM (IST)

    29 Jul 2026 03:55 PM (IST)

    Nagpur Crime : फरार “इक्का” ला २४ तासांत केले जेरबंद

    नागपूर, क्राईम रिपोर्टर, हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पोलिसांना गुंगारा देत पसार झालेला घरफोडीचा सराईत आरोपी इक्का ऊर्फ हर्ष महेंद्र रामटेके (२५) याला अवघ्या २४ तासांत तिरोडा येथून जेरबंद केले, तिरोडा पोलिसांनी त्याला अटक करून हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. कोठडीतून आरोपी पसार झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करणे हे हुडकेश्वर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे आव्हान ठरले होते. विविध पथके रात्रंदिवस शोधमोहीम राबवत होती. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि तिरोडा पोलिसांच्या समन्वयातून आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

  • 29 Jul 2026 03:50 PM (IST)

    29 Jul 2026 03:50 PM (IST)

    वेगाने वितळतोय अंटार्क्टिकातील बर्फ; जागतिक आपत्ती टाळण्यासाठी जगाकडे उरले फक्त 30 ते 50 वर्षे

    आपली पृथ्वी एका अत्यंत नाजूक आणि गंभीर टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. हवामान बदलामुळे (Climate Change) आणि वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे आज जगभरात समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच संदर्भात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘नेचर’ (Nature) या नियतकालिकात नुकताच एक अत्यंत चिंताजनक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनात जगभरातील शास्त्रज्ञांनी सर्व देशांच्या सरकारांना आणि धोरणकर्त्यांना एका मोठ्या आपत्तीबद्दल तीव्र इशारा दिला आहे. अंटार्क्टिकामधील बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी ज्या वेगाने वाढणार आहे, त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक धोरणे, पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन योजना विकसित करण्यासाठी जगाकडे आता फक्त ३० ते ५० वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. जर या काळात कठोर आणि ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात अनेक देशांना अभूतपूर्व विनाशाचा सामना करावा लागेल.

  • 29 Jul 2026 03:45 PM (IST)

    29 Jul 2026 03:45 PM (IST)

    ‘अगं अगं अहो आई’मधील भूमिकेला हृताने का दिला होकार? अभिनेत्रीने सांगितलं खास कारण

    मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच झी ५ मराठीवरील ‘अगं अगं अहो आई’ या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती ‘श्रेया’ ही भूमिका साकारत असून, तिच्यासोबत रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींची साथ लाभली आहे. या भूमिकेला होकार देण्यामागचं खास कारण हृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. हृता म्हणाली, “‘अगं अगं अहो आई’मध्ये मी श्रेयाची भूमिका साकारतेय. रेणुका ताई माझ्या आईच्या भूमिकेत आहेत, तर निर्मिती ताई माझ्या सासूची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर या मालिकेला नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं.” या मालिकेची कथा नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यातील पहिल्या वर्षाभोवती फिरते. त्या काळात घडणारे अनेक महत्त्वाचे प्रसंग प्रत्येकालाच कुठे ना कुठे स्वतःशी जोडलेले वाटतील, असंही तिने सांगितलं.

  • 29 Jul 2026 03:40 PM (IST)

    29 Jul 2026 03:40 PM (IST)

    पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस

    खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण नेमके किती आहे, हे ग्राहकांना खरेदी करतानाच सहज कळावे, यासाठी पाकिटाच्या दर्शनी भागावर पोषणविषयक लेबल लावणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस एका संसदीय समितीने केली आहे. खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखालील ‘ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण’ विषयक स्थायी समितीने हा अहवाल सादर केला आहे. समितीने बालकांसाठी असलेल्या पॅकेज्ड अन्नातील साखरेच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. तृणधान्यांवर आधारित अन्नपदार्थांमध्ये किती ‘अॅडेड शुगर’ आहे, हे स्पष्टपणे सांगावे. प्रत्येक सव्हिंगमध्ये साखरेचे प्रमाण ग्रॅममध्ये आणि बालकांच्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजेनुसार त्याचे टक्केवारीतील प्रमाण पॅकेटवर छापावे, असे समितीने म्हटले आहे.

  • 29 Jul 2026 03:35 PM (IST)

    29 Jul 2026 03:35 PM (IST)

    झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर

    ICC Rankings/Vaibhav Suryavanshi: नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली आहे. या सिरिजमध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय प्राप्त केला आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतक करत 151 रन्स केल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळे त्याने आयसीसी रॅंकिंगमध्ये देखील मोठी उडी घेतली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने 151 रन्स केल्या आहेत. या सिरिजमध्ये त्या दोन अर्धशतके लगावली आहेत. या कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने प्लेयर ऑफ द सिरिज आणि प्लेयर ऑफ द मॅच हे दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 15 व्या वर्षी हा मान मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

  • 29 Jul 2026 03:30 PM (IST)

    29 Jul 2026 03:30 PM (IST)

    Washim News: वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; तिघांना अटक, कामरगाव आणि अहमदनगरातील प्रकार

    वाशिम: जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम, एक चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस स्टेशन धनज येथे शनिवारी फिर्यादी सुभाष भाऊराव निघोट (रा. रामनगर, कामरगाव, ता. कारंजा, जि. वाशिम) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच / ३७जी ७६२२ क्रमांकाची कार चोरट्याने चोरून नेली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आहे यांनी दोन विशेष पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली.

  • 29 Jul 2026 03:25 PM (IST)

    29 Jul 2026 03:25 PM (IST)

    आषाढी एकादशीनिमित्त ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची घोषणा; विठ्ठलभक्ती आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास

    Mukkam Post Pandharpur: आषाढी एकादशीच्या (aashadhi ekadashi) पावन मुहूर्तावर एका नव्या आशयघन मराठी नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ (Mukkam Post Pandharpur)हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म, नाती आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणारी ही कलाकृती असल्याचे पहिल्या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. “पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते,” या अर्थपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीकडे सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित नसून, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा वेध घेणारे असेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 29 Jul 2026 03:20 PM (IST)

    29 Jul 2026 03:20 PM (IST)

    Chandrapur News: चंद्रपुरात वाघांची संख्या ३०० पार; वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

    चंद्रपूर: वाघांच्या अधिवासासाठी ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा आता वाढत्या वाघसंख्येमुळे नव्या व्यवस्थापनाच्या आव्हानांना सामोरे जात आहे. मागील १० वर्षात जवळपास वाघांच्या संख्येत ६ पटीने वाढ झालेली आहे. जंगलातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असताना, त्यांच्या अधिवासावर वाढता ताण, अन्नसाखळीवरील दबाव, जंगलालगतच्या गावांमध्ये वाढणारा वावर आणि मानव-वन्यजीव संघर्ष या समस्या अधिक गंभीर होत आहेत. त्यामुळे ‘वाघ वाढले, पण त्यांच्या व्यवस्थापनाचे काय?’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या अधिवासास प्रारंभ होत असताना २०१० च्या सुमारास जिल्ह्यात जवळपास २५ एवढी वाघांची संख्या होती. ती संख्या वाढून २०१५ मध्ये ५० च्या जवळपास पोहचली. आज जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या ही ३०० च्या जवळपास पोहचलेली आहे.

  • 29 Jul 2026 03:15 PM (IST)

    29 Jul 2026 03:15 PM (IST)

    PoK Protest: ‘एक जरी वाचला तरी…’ PoK मध्ये रक्ताची होळी; पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध JAAC ची आरपारची लढाई

    पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoJK) सध्या अत्यंत भयावह आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार आणि तेथील क्रूर लष्कराच्या दडपशाहीविरोधात स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता रक्ताळलेले स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या ४८ तासांत पाकिस्तानी सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या थेट आणि अमानुष गोळीबारात किमान ३१ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या नव्या हिंसाचारामुळे ५ जूनपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक जनआंदोलनात प्राणास मुकलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता ८० च्या वर पोहोचली आहे.

  • 29 Jul 2026 03:10 PM (IST)

    29 Jul 2026 03:10 PM (IST)

    संसदेत राहुल गांधींच्या ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

    Rahul Gandhi News Marathi: लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान आज (29 जुलै 2026) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. भाषणात एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी ‘स्टुडंट’, ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या शब्दांचा उल्लेख केला. या शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंधित टिप्पणी लोकसभेच्या अधिकृत कामकाजाच्या नोंदीतून वगळण्यात आली.

  • 29 Jul 2026 02:59 PM (IST)

    29 Jul 2026 02:59 PM (IST)

    काँग्रेसचे फॉलोवर सुद्धा राहिलेले नाहीत - गिरीश महाजन

    काँग्रेसचा आता कोणताही अजेंडा राहिलेला नाही. त्यांचे फॉलोवर सुद्धा राहिलेले नाहीत. विधानसभा महानगरपालिका अशा कोणत्याही ठिकाणी त्यांचं अस्तित्व राहिलेले नाही. असं काहीतरी झालं की घोषणा द्यायच्या निदर्शना करायची, याशिवाय त्यांचा अस्तित्व राहिलेलं नाही. अशा शब्दात काँग्रेसवर मंत्री गिरीश महाजन यांनी घणाघात केला आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता विमानतळ येथे बोलत होते.

  • 29 Jul 2026 02:50 PM (IST)

    29 Jul 2026 02:50 PM (IST)

    पंधरा लाखांचे एमडी ड्रग्स पकडले; मानवत पोलिसांची मोठी कारवाई

    मानवत पोलिसांनी तालुक्यातील रत्नापूर शिवारात धाड टाकत तब्बल 14 लाख 64 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे मानवत पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचे धागेदोरे आणखी किती खोलवर गेले आहेत याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

  • 29 Jul 2026 02:41 PM (IST)

    29 Jul 2026 02:41 PM (IST)

    MPSC राज्य उत्पादन शुल्क विभाग उपनिरीक्षक पद भरतीला स्थगिती; न्यायालयाने घेतली दखल !

    MPSC  च्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक पद भरतीमध्ये पेपरफुटी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जुन्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेत पुढील आदेशापर्यंत भरती प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि एमपीएससी सचिवांना नोटीस बजावून 4 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले देण्यात आले आहेत.

  • 29 Jul 2026 02:30 PM (IST)

    29 Jul 2026 02:30 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया; 'विपर्यास करण्यात आला'

    शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पाटील यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे भरणे यांनी स्पष्ट करत टीकेला उत्तर दिले.

  • 29 Jul 2026 02:21 PM (IST)

    29 Jul 2026 02:21 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांचे एकजुटीचे आवाहन

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठवाड्यातील सर्व प्रलंबित नोंदींची प्रमाणपत्रे आणि हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व मराठा समाजाने मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  • 29 Jul 2026 02:10 PM (IST)

    29 Jul 2026 02:10 PM (IST)

    राहुल गांधींनी विद्यार्थ्यांविषयी काय म्हटले?

    राहुल गांधी विधान केलं की, "मी विद्यार्थ्याची व्याख्या करत आहे. विद्यार्थी सतत सत्याचा शोध घेत असतो. गांधीजींनी म्हटले होते की, आपल्या घराच्या खिडक्या सर्व दिशांनी येणाऱ्या वाऱ्यासाठी खुल्या असाव्यात. मी एका विद्यार्थिनीला 'मूर्ख' (idiot) व्यक्तीबद्दल तिचे मत विचारले म्हणजेच अशा व्यक्तीबद्दल जी विद्यार्थी नाही. त्यावर ती म्हणाली की, विद्यार्थी अभिमानाने सत्याची बाजू घेतो, तर इतर लोक आपल्या प्रतिमेची (इमेजची) चिंता करतात. 'मूर्ख' व्यक्ती स्वतःलाच देव मानते आणि म्हणूनच स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करते."

  • 29 Jul 2026 02:00 PM (IST)

    29 Jul 2026 02:00 PM (IST)

    घटनेसाठी जबाबदार कोण? शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रकारानंतर व्हायरल पोस्टमधून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

    डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या (Dombivli Doctor Assault Case) घटनेनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी तयार केलेला अहवाल केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे सादर केला असून, आता पुढील प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 29 Jul 2026 01:55 PM (IST)

    29 Jul 2026 01:55 PM (IST)

    रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; नागरिक संतप्त

    न्यू तापडियानगर येथील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. पुलाचे प्रत्यक्ष काम वेगाने सुरू होईपर्यंत पूर्ववत हे रेल्वे गेट ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांसाठी तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. नरेंद्र बेलसरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेऊन संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

  • 29 Jul 2026 01:47 PM (IST)

    29 Jul 2026 01:47 PM (IST)

    भारतीय संघाच्या वाटेवर काटे! 15 खेळाडूंनी मिळून खेळलेत केवळ 8 कसोटी सामने

    भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. पहिला सामना १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे, तर दुसरा सामना २३ ऑगस्ट रोजी कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये होईल. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग देखील असेल. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्भेळ विजय मिळवल्यामुळे भारतीय संघावर प्रचंड दबाव आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका भारताचा शेजारी देश असला तरी, दोन्ही देशांमधील परिस्थितीमध्ये लक्षणीय फरक आहे.

  • 29 Jul 2026 01:45 PM (IST)

    29 Jul 2026 01:45 PM (IST)

    8 व्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका!

    सध्या 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) शिफारशींच्या अंमलबजावणीची लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहे. पण याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला झटका बसणार आहे. नोकरीसंबंधी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. यानुसार, काही कर्मचाऱ्यांना मॉडिफाइड एश्योर्ड करियर प्रोग्रेशन म्हणजेच MACP योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांचा फायदा घेता येणार नाही. नेमकी काय आहे ही योजना जिचा लाभ घेता येणार नाही आहे? त्याचा कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

  • 29 Jul 2026 01:40 PM (IST)

    29 Jul 2026 01:40 PM (IST)

    सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू

    राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या ( Commonwealth Games 2026)  स्पर्धेतील ॲथलेटिक्सच्या ट्रॅकवर भारताचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे. २७ वर्षीय भारतीय धावपटू गुलवीर सिंगने २८ जुलै रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून नियुक्त झालेल्या गुलवीर सिंग या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • 29 Jul 2026 01:35 PM (IST)

    29 Jul 2026 01:35 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचे नवे नियम

    राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर आता अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी करण्यास मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.

  • 29 Jul 2026 01:25 PM (IST)

    29 Jul 2026 01:25 PM (IST)

    1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय

    १ ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर असणार आहे. केंद्र सरकारने साखर साठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साठेबाजी रोखण्यासाठी, सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आणि वाजवी दरात साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. या उपक्रमांतर्गत, देशभरातील साखर व्यापाऱ्यांना १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत साठा मर्यादा मंजूर करण्यात आली आहे. नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे? आणि त्याचा व्यापाऱ्यांवर काय, कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊयात.

  • 29 Jul 2026 01:15 PM (IST)

    29 Jul 2026 01:15 PM (IST)

    ’28 तारखेपर्यंत प्रमाणपत्र द्या, अन्यथा…’, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रे द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत, यावेळी कोणतीही माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • 29 Jul 2026 01:05 PM (IST)

    29 Jul 2026 01:05 PM (IST)

    कोण आहेत जंतर-मंतर आंदोलनातून वायरल झालेले मोहम्मद इरफान?

    दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीने केलेल्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर एका आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीतील एका झोपडपट्टीत राहणारे आणि व्यवसायाने फेरीवाले असलेले मोहम्मद इरफान आपल्या एका मुलाखतीनंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दिल्लीतील सावदा जेजे कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय मोहम्मद इरफान यांची संविधान, लोकशाही, कामगारांचे हक्क आणि सामाजिक मुद्द्यांवरील सखोल समज पाहून लोक अचंबित झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, जंतर-मंतर आंदोलनातून प्रसिद्ध झालेले इरफान नेमके किती शिकलेले आहेत.

  • 29 Jul 2026 12:55 PM (IST)

    29 Jul 2026 12:55 PM (IST)

    आयआयएम अहमदाबादमध्ये मोफत पीएचडी करण्याची सुवर्णसंधी!

    PhD ची संपूर्ण प्रक्रिया कशी असते?

    संस्थेच्या अधिकृत माहितीनुसार, हा कार्यक्रम सरासरी चार ते पाच वर्षांचा असतो. सुरुवातीच्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना सखोल कोर्सवर्क करावे लागते, ज्यामध्ये ॲडव्हान्स डॉक्टोरल लेव्हलच्या विषयांसह इतर पोस्ट ग्रेजुएट प्रोग्रामच्या कोर्सेसचाही समावेश असतो. या अभ्यासक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटच्या विविध क्षेत्रांची सखोल माहिती देणे आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करणे हा आहे.

    कोर्सवर्क पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक सर्वसमावेशक परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, त्यानंतर ते त्यांच्या ‘थीसिस ॲडव्हायझरी कमिटी’च्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू करतात.

  • 29 Jul 2026 12:45 PM (IST)

    29 Jul 2026 12:45 PM (IST)

    Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस

    एका संसदीय समितीने इंस्टाग्रामसह प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींना तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सोशल मीडिया आणि डिजीटल प्लॅटफॉर्म्सच्या नियमांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. भाजपचे खासदार आणि ‘संपर्क व माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समिती’चे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. दुबे म्हणाले की, समितीने मेटा (फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप), गूगल, एक्स आणि स्नॅपचॅटच्या प्रतिनिधींना याबाबत स्पष्टिकरण देण्यासाठी बोलावले आहे की, ते महिला, लहान मुलं, शेतकरी, ग्रामीण जनता, कामगार आणि सामान्य नागरिक यांची सुरक्षा कशी सुनिश्चित करतात आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात.

  • 29 Jul 2026 12:35 PM (IST)

    29 Jul 2026 12:35 PM (IST)

    सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली

    आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “सध्या आपल्या देशातील अनेक भाग पूरस्थितीचा सामना करत आहेत. त्यामध्ये आसामची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेक कुटुंबांनी आपली घरे, शेती, पशुधन आणि काहींनी तर आपल्या प्रिय व्यक्तींनाही गमावले आहे.”

  • 29 Jul 2026 12:25 PM (IST)

    29 Jul 2026 12:25 PM (IST)

    शेतकरी कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव नाही का? मग हे वाचा

    पहिल्या यादीत नाव नसेल तर काय करावे?

    ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता संबंधित जिल्हास्तरीय समिती किंवा तहसीलदार कार्यालयाकडे आवश्यक अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार प्रशासनाने केले आहे.

    एनपीए कर्जखात्यांनाही मोठा दिलासा

    व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) कर्जखात्यांसाठी कालावधीनुसार 35 ते 85 टक्क्यांपर्यंत तडजोडीची सवलत देण्यात आली आहे. गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील तडजोडीच्या रकमेपैकी पात्र शेतकऱ्यांच्या ₹2 लाखांपर्यंतच्या थकबाकीची भरपाई राज्य सरकार करणार आहे.

  • 29 Jul 2026 12:15 PM (IST)

    29 Jul 2026 12:15 PM (IST)

    विकासाच्या नावाखाली विस्थापन मान्य नाही! सफाळे पश्चिम किनारपट्टीवर जनआंदोलन

    पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातील प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्पांविरोधातील जनआंदोलनाला आता धार्मिक आणि सामाजिक एकजुटीची जोड मिळू लागली आहे. सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरातील ग्रामस्थांनी आशापुरी मातेच्या मंदिरात एकत्र येत आपल्या जमिनी, समुद्र, शेती, मत्स्य व्यवसाय आणि गावांचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी सामूहिक प्रार्थना केली. विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

  • 29 Jul 2026 12:13 PM (IST)

    29 Jul 2026 12:13 PM (IST)

    आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले

    जंतर-मंतरवरील आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा आणि आंदोलकांचा आक्रोश दिसून आला. काही व्हिडिओजमध्ये आंदोलनादरम्यान लोकांमध्ये उत्साह दिसला पण यात एक लव्हस्टोरी देखील चर्चेत राहिती ते तुम्हाला माहिती आहे का? पठ्ठ्या गेला तर आंदोलनात सामील होण्यासाठी होता पण परिस्थितीने तिथेच त्याला लाईव्ह पार्टनर देखील मिळवून दिली. आंदोलनात झालेली भेट आणि यादरम्यान उमललेले प्रेम ही संपूर्णच कहाणी फार रंजक असून दोघांच्याही मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • 29 Jul 2026 11:40 AM (IST)

    29 Jul 2026 11:40 AM (IST)

    माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं

    आपल्या बुद्धीचा आणि मिळालेल्या शारीरिक बळाचा वापर करत मानव बऱ्याच काळापासून मुक्या प्राण्यांना क्रुर वागणूक करत आला आहे. कधी गायीला चारचाकीला बांधून फरफटवलं जातं तर कधी कुत्र्याला लाठीने मारहाण केली जाते. या घटनांचे दृष्य याआधीही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे आणि अशातच आणखी एका धक्कादायक कृत्याची यात नोंद झाली आहे. ठाण्यातील अंबरनाथ येथील इमारतीत व्यक्तीने मांजरीला १२ व्या मजल्यावरुन खाली लोटल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: 29 july 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime business education national international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Monsoon Alert
  • national news

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?
2

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?

Maharashtra Live breaking News in Marathi: उद्धव ठाकरे प्रदीप पुर्णेकरांच्या निवासस्थानी दाखल
3

Maharashtra Live breaking News in Marathi: उद्धव ठाकरे प्रदीप पुर्णेकरांच्या निवासस्थानी दाखल

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
4

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.