India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता (फोटो-सोशल मीडिया)
India EU trade deal: ट्रेड डील हा आता बुद्धिबळाच्या खेळासारखा बनत चालला आहे, जिथे तुमच्या एका चालीमुळे प्रतिस्पर्धकाचे नुकसान होत असले तरी, तिसऱ्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे हे एका युद्धासारखे आहे आणि युद्धात शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ‘ग्रीनलँड टॅरिफ’ मुळे युरोपीय संघ आणि डोनाल्ड ट्रम्प समोरासमोर उभे ठाकले आहेत. हीच स्थिती भारतासाठी अनुकूल ठरताना दिसत आहे. अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलला उशीर होत असला तरी, जगातील २७ विकसित देशांच्या समूहासोबत (ईयू) करार झाला, तर भारताच्या अडचणी बऱ्याच अंशी दूर होतील. दोन्ही पक्षांमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, युरोप भारतासोबत खूप मोठी ट्रेड डील करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ अमेरिकेला धडा शिकवणे आणि भारताशी जवळीक वाढवणे, याचे पडसाद अमेरिकेतही पाहायला मिळू शकतात.
अमेरिका आणि युरोपीय संघामध्ये निर्माण झालेल्या टॅरिफ वॉरच्या शक्यतेमुळे, २७ देशांच्या युरोपीय संघात भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळू शकते. रेडिमेड कपड्यांचे निर्यातदार टीटी लिमिटेड’ चे एमडी संजय जैन यांनी सागितले की, युरोपीय संघ या कराराची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितो. यामुळे आपल्याला केवळ चांगली डीलच मिळणार नाही, तर रॅक्टिफिकेशनच्या प्रक्रियेलाही वेग येईल. २७ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेदरम्यान भारत आणि यूरोपीय संघ मुक्त व्यापार कराराची चर्चा समाप्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.
युरोपियन कौन्सिलवे अध्यक्ष अॅटोनियी कोरटा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला पॉन डेर लेयेन यांच्या २५ ते २७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या अधिकृत भारत भेटीदरम्यान ही घोषणा होईल, हे दोन्ही नेते २६ जानेवारीला दिल्लीतील प्रजासताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी देखील असतील. यामुळे भारताचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
एका अधिका-याने सांगितले की, अस्थिर जागतिक परिस्थितीत भारत हा एक स्थिर व्यापारी भागीदार असल्याने ही भारतासाठी मोठी संधी आहे. वॉशिंग्टन आणि चीजिंग याच्यातील व्यापारी अनिश्चिततेच्या काळात भारताची निर्यात ज्याप्रमाणे वाढली, तसंच आताही घडू शकते, म्हणजेच अमेरिका, चीन आणि युरोप यांच्यातील हे व्यापार युद्ध भारतासाठी फायद्याचे टरू शकते. दोनही पक्ष प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी (एफटीए) सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत.






