India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत दरमहा सुमारे २० लाख टन एलपीजी आयात करतो. यापूर्वी देशाच्या गरजेचा मोठा हिस्सा सौदी अरेबिया, यूएई, कतार यांसारख्या मध्यपूर्वेतील देशांकडून पूर्ण होत होता.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील वाहतूक अडचणींमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला. एप्रिल २०२६ मध्ये भारताची एलपीजी आयात घटून ६.९६ लाख टनांवर आली होती.
त्यानंतर केंद्र सरकारने तेल कंपन्यांना अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात एलपीजी खरेदी करण्याचे निर्देश दिले. परिणामी मे महिन्यात आयात वाढून ११.५ लाख टनांपर्यंत पोहोचली असून, जूनमध्ये ती ११ ते १२ लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेकडून एलपीजी खरेदी वाढवण्यामागे ऊर्जा सुरक्षेसोबतच भारत-अमेरिका व्यापार संतुलन सुधारण्याचाही उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय कंपन्यांनी महाग दरातही स्पॉट मार्केटमधून एलपीजी खरेदी केली, कारण देशातील घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवणे सरकारची प्राथमिकता आहे.
दरम्यान, यूएई, कुवेत, कतार, ओमान, अल्जेरिया आणि नायजेरियाकडूनही एलपीजी पुरवठा सुरू आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील परिस्थिती सामान्य झाल्यास मध्यपूर्वेतील पुरवठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या अमेरिकेचा उदय भारताचा प्रमुख एलपीजी पुरवठादार म्हणून होत असून, हा देशाच्या ऊर्जा धोरणातील महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी भारतसोबतचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला. मंगळवारी (२३ जून) कॅपिटल हिल येथे फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज च्या कार्यक्रमात याची माहिती दिली. त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चांगल्या संबंधामुळे करारा गती मिळाली आहे.
US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द






