Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Iran Conflict : ‘सर्व काही ठीक आहे, प्रकरण…’ टँकर हल्ल्यानंतर इराणचे ‘ते’ शब्द; भारतासाठी इशारा की दिलासा?

'भारत आणि इराण यांचे संबंध खूप घट्ट आहेत आणि ज्या घटनेचा उल्लेख केला जात आहे त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि या प्रकरणाचे निराकरण होईल,' असे इलाही म्हणाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2026 | 09:20 AM
india iran tanker attack hormuz strait mea summons envoy 2026

india iran tanker attack hormuz strait mea summons envoy 2026

Follow Us
Follow Us:
  • भारतीय टँकर्सवर गोळीबार
  • इराणचे ‘काणाडोळा’ धोरण
  • भारताचा तीव्र निषेध

Dr Abdul Majid Hakim Elahi statement on India Iran relations : मध्य पूर्व आशियात अमेरिका आणि इराणमधील युद्ध शिगेला पोहोचले असतानाच, आता भारताचे दोन मोठे व्यापारी टँकर्स या संघर्षाच्या विळख्यात सापडले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या ‘जग अर्णव’ (Jag Arnav) आणि ‘सनमार हेराल्ड’ (Sanmar Herald) या दोन भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर इराणी नौदलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भारताने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, इराणला जागतिक व्यासपीठावर घेरण्यास सुरुवात केली आहे.

नेमकी घटना काय आणि इराणचा पवित्रा काय?

हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांना या हल्ल्याबाबत विचारले असता, त्यांनी चकित करणारी प्रतिक्रिया दिली. “भारत आणि इराणचे संबंध खूप घट्ट आहेत, मला अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. इलाही यांनी भारत-इराण संबंधांच्या ५००० वर्षांच्या इतिहासाचा दाखला देत सांगितले की, इराण युद्धाच्या नाही तर शांततेच्या बाजूने आहे. मात्र, एकीकडे शांततेच्या गप्पा आणि दुसरीकडे भारतीय जहाजांवर गोळीबार, यामुळे इराणच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ayodhya, UP | Dr Abdul Majid Hakeem Ilahi, Representative of Iran’s Supreme Leader in India, says, “I am thankful to all my brothers and sisters in India. I am affected by their emotions and feelings. I was never expecting such emotions towards oppressed people, justice and… pic.twitter.com/pUd9PF6wTE — Mint (@livemint) April 14, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’

दिल्लीत राजदूतांची झाडाझडती

या घटनेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परराष्ट्र सचिवांनी इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फथाली यांना तातडीने बोलावून घेतले. या बैठकीत भारताने आपला तीव्र निषेध नोंदवला. “भारतीय व्यापारी जहाजे आणि खलाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे भारताने निक्षून सांगितले. इराणने यापूर्वी अनेकदा भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला आहे, मग आताच गोळीबार का झाला? असा सवालही विचारण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने इराणला होर्मुझमधून भारतीय जहाजांचा मार्ग त्वरित मोकळा करण्याची विनंती केली आहे.

५००० वर्षांची मैत्री आणि सद्यस्थिती

इलाही यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यातील यशस्वी चर्चेचा उल्लेख केला. त्यांच्या मते, भारतीय संस्कृती आणि इराणी तत्वज्ञान एकमेकांशी जोडलेले आहेत. परंतु, प्रत्यक्ष जमिनीवर (आणि समुद्रावर) परिस्थिती वेगळी दिसत आहे. ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ या जहाजांमध्ये लाखो बॅरल इराकी तेल होते, जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता असतानाच भारताला लक्ष्य केल्याने चिंतेचे वातावरण आहे.

#WATCH | Hyderabad | On the shooting incident involving two Indian-flagged ships in the Strait of Hormuz, Dr Abdul Majid Hakeem Ilahi, representative of Iran’s Supreme Leader in India, says, “The relationship between Iran and India is very strong and I don’t know anything about… pic.twitter.com/KdsLQBkbmw — ANI (@ANI) April 18, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Minamitorishima: जपानला समुद्राच्या 6 किलोमीटर खोलीवर सापडली मौल्यवान खनिजे; ड्रॅगनचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी टोकियो सज्ज

होर्मुझचा ‘चोकपॉईंट’ आणि भारताचे हित

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे. या मार्गावरून जगाचा २०% तेल पुरवठा होतो. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे संतापलेल्या इराणी नौदलाने (IRGC) या भागात कडक निर्बंध लादले आहेत. अशातच भारतीय जहाजांवर झालेला गोळीबार हा ‘चुकीने झालेला’ होता की ‘जाणीवपूर्वक दिलेला इशारा’, याचे विश्लेषण भारतीय नौदल करत आहे. सध्या या भागात भारतीय युद्धनौका नसल्याचा फायदा घेत इराणने ही कृती केल्याचे बोलले जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या भारतीय जहाजांवर हल्ला झाला?

    Ans: 'जग अर्णव' (Jag Arnav) आणि 'सनमार हेराल्ड' (Sanmar Herald) या दोन भारतीय ध्वज असलेल्या टँकर्सवर होर्मुझमध्ये गोळीबार झाला.

  • Que: इराणचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद इलाही यांनी काय म्हटले?

    Ans: त्यांनी या हल्ल्याच्या माहितीचा इन्कार केला असून भारत-इराण संबंध ५००० वर्षे जुने आणि घट्ट असल्याचे सांगितले आहे.

  • Que: भारताने यावर काय कारवाई केली?

    Ans: परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना पाचारण करून औपचारिक निषेध नोंदवला आणि भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची मागणी केली.

Web Title: India iran tanker attack hormuz strait mea summons envoy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • India news
  • iran
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव
1

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा
2

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
3

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
4

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.