Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sagar Bandhu : ‘Thank you India’ श्रीलंकन नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; भारताच्या मदतीने पुन्हा रुळावर आले जनजीवन

भारतीय मदतीने श्रीलंकेतील एक प्रमुख रेल्वे मार्ग पुनर्संचयित करण्यात आला आहे. दितावा चक्रीवादळादरम्यान उत्तर रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. भारतीय मदतीने जानेवारी महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2026 | 01:05 PM
india restores sri lanka northern railway line operation sagar bandhu gratitude 2026

india restores sri lanka northern railway line operation sagar bandhu gratitude 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन सागर बंधू’ला यश
  • नववर्षाची मोठी भेट
  • मोठ्या मदतीचा हात

India Sri Lanka railway project 2026 : जेव्हा संकट येते, तेव्हा खरा मित्रच मदतीला धावून येतो, हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. श्रीलंकेत (Shrilanka) ‘दितावाह’ चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता, ज्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले होते. विशेषतः उत्तर रेल्वे मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, ज्यामुळे हजारो लोकांचा संपर्क तुटला होता. मात्र, भारताच्या ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत हा रेल्वे मार्ग आता पुन्हा एकदा धावू लागला आहे. गुरुवार, ९ एप्रिल रोजी या मार्गावर रेल्वे सेवा अधिकृतपणे सुरू झाली आणि श्रीलंकन जनतेने भारताचे आभार मानण्यास सुरुवात केली आहे.

संकटात भारताची साथ: काय आहे ‘ऑपरेशन सागर बंधू’?

२८ नोव्हेंबर २०२५ रोजी जेव्हा श्रीलंकेला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला, तेव्हा भारताने त्वरित ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले. या मोहिमेचा उद्देश केवळ अन्न किंवा औषधे पुरवणे हा नव्हता, तर उद्ध्वस्त झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा उभी करणे हा होता. भारताने जाहीर केलेल्या ४५० दशलक्ष डॉलर्सच्या एकूण मदत पॅकेजपैकी ५ दशलक्ष डॉलर्स थेट उत्तर रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी देण्यात आले. ११ जानेवारी रोजी भारतीय उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे रेल्वे मंत्री बिमल रत्नायके यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान

अवघ्या ३ महिन्यांत अशक्य ते शक्य!

रेल्वे मार्गाची पुनर्बांधणी करणे हे एक मोठे आव्हान होते. रस्ते, पूल आणि सिग्नल यंत्रणा चक्रीवादळामुळे वाहून गेली होती. मात्र, भारतीय अभियंते आणि श्रीलंकन कामगारांच्या अथक परिश्रमामुळे अवघ्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण झाले. ९ एप्रिल रोजी जेव्हा पहिली रेल्वे या रुळावरून धावली, तेव्हा लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने याची घोषणा करताना म्हटले की, “नववर्षापूर्वी हा मार्ग सुरू झाल्याने वाहतुकीची अत्यावश्यक साधने पुन्हा उपलब्ध झाली असून जनजीवन सुलभ झाले आहे.”

Indian Army restores key road in cyclone-hit Sri Lanka under Operation Sagar Bandhu 🔗https://t.co/vhgagR0AcN pic.twitter.com/FfcHfrGNOM — DD India (@DDIndialive) January 7, 2026

credit – social media and Twitter

सोशल मीडियावर ‘थँक्यू इंडिया’चा ट्रेंड

श्रीलंकन नागरिकांसाठी हे केवळ रेल्वे मार्ग सुरू होणे नव्हते, तर ते आपल्या हक्काच्या शेजाऱ्याने दिलेल्या प्रेमाचे प्रतीक होते. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर सिंहली आणि तमिळ बांधवांनी भारताचे मनापासून आभार मानले आहेत. एका युजरने लिहिले, “आमच्या सर्वात कठीण काळात भारताने दिलेला हा पाठिंबा आम्ही कधीही विसरणार नाही. नववर्षाच्या शुभेच्छांसोबतच भारताला खूप खूप धन्यवाद!” नववर्षाच्या सणासुदीच्या काळात हा मार्ग सुरू झाल्याने उत्तर श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांनाही गती मिळणार आहे.

Train services on the Northern Railway Line resume today after India-supported restoration of cyclone-damaged sections under a USD 5M grant, part of India’s USD 450M assistance package.
Thank you, India 🇱🇰🇮🇳
Completed ahead of the Sinhala & Tamil New Year, reconnecting vital… pic.twitter.com/T5US2D5x3G
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) April 9, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Peace : ‘इराण-रशियापासून युक्रेनपर्यंत…’ 72 तासांत थांबली आठ देशांमधील युद्ध; जाणून घ्या ‘हे’ दिव्य कसे घडले?

मैत्रीचा नवा अध्याय

भारताने नेहमीच ‘शेजारी प्रथम’ (Neighborhood First) या धोरणाला प्राधान्य दिले आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटात असो किंवा नैसर्गिक आपत्तीत, भारत नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. दितावाह चक्रीवादळाने रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान केले होते, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला होता. आता रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे या भागातील समुदायांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीलंकेचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनीही भारताचे हे सहाय्य अत्यंत कळीचे असल्याचे नमूद केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रीलंकेत भारताने कोणता रेल्वे मार्ग दुरुस्त केला आहे?

    Ans: भारताने 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत श्रीलंकेतील चक्रीवादळग्रस्त 'उत्तर रेल्वे मार्ग' (Northern Railway Line) दुरुस्त केला आहे.

  • Que: या रेल्वे प्रकल्पासाठी भारताने किती मदत दिली?

    Ans: भारताने एकूण ४५० दशलक्ष डॉलर्सच्या मदत पॅकेजपैकी ५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४२ कोटी रुपये) या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनुदान म्हणून दिले आहेत.

  • Que: 'ऑपरेशन सागर बंधू' कधी सुरू करण्यात आले?

    Ans: श्रीलंकेतील चक्रीवादळग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनासाठी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताने हे ऑपरेशन सुरू केले.

Web Title: India restores sri lanka northern railway line operation sagar bandhu gratitude 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Cyclone
  • Shrilanka
  • World news

संबंधित बातम्या

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये
1

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral
2

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका
3

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

US Helicopter Crash : मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ! होर्मुझजवळ अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; थोडक्यात बचावले वैमानिक
4

US Helicopter Crash : मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ! होर्मुझजवळ अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; थोडक्यात बचावले वैमानिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.