
real life spider man rescues wheelchair user jonesboro arkansas viral video
चित्रपट आणि कॉमिक बुक्समध्ये आपण अनेकदा स्पायडर-मॅनला लोकांचे प्राण वाचवताना आणि दुष्टांचा पराभव करताना पाहतो. पण जर हाच सुपरहिरो प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांसमोर रस्त्यावर उतरून एखाद्याचा जीव वाचवताना दिसला तर? अमेरिकेतील (America) आर्कान्सास राज्यातील जोन्सबोरो (Jonesboro) शहरात अगदी असाच एक थक्क करणारा प्रसंग घडला आहे. एका व्यस्त आणि अत्यंत गजबजलेल्या सहा पदरी महामार्गावर जेव्हा एक अपंग व्यक्ती व्हीलचेअरसह ट्रॅफिकमध्ये अडकली, तेव्हा स्पायडर-मॅनच्या पोशाखातील एका तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला. ही घटना एखाद्या काल्पनिक सिनेमाचा सीन नसून प्रत्यक्ष घडलेली वास्तववादी घटना आहे. जोन्सबोरो शहरातील ट्रॅफिक सिग्नलवरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच तो वाऱ्याच्या वेगाने पसरला असून जगभरातून या ‘खऱ्या स्पायडर-मॅन’चे कौतुक केले जात आहे.
ही थरारक घटना मंगळवारी भरदुपारी घडली. जोन्सबोरो शहरातील एका मुख्य चौकात सहा पदरी रस्ता ओलांडताना एक दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरसह रस्त्याच्या मधोमध अडकून पडली होती. कडक ऊन आणि दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांच्या वेगामुळे त्या व्यक्तीला पुढे जाणे कठीण झाले होते. ट्रॅफिक सिग्नल लाल असल्यामुळे वाहने काही क्षणांसाठी थांबली होती, परंतु सिग्नल हिरवा होण्यास अवघे काही सेकंद उरले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान
नेमक्या याच वेळी २० वर्षांचा क्रिस्टोफर हेलेंथल (Christopher Hellenthal) आपल्या लाल रंगाच्या जीपमधून त्या रस्त्यावरून जात होता. तो स्थानिक ‘अल्टिमेट एअर ट्रॅम्पोलिन पार्क’मध्ये काम करतो आणि तिथे लहान मुलांसाठी आयोजित ‘सुपरहिरो डे’च्या कार्यक्रमामधून घरी परतत होता. त्यामुळे त्याने स्पायडर-मॅनचा पोशाख परिधान केला होता. रस्त्याच्या मधोमध व्हीलचेअरवर अडकलेल्या व्यक्तीला पाहताच क्रिस्टोफरच्या अंगातील सुपरहिरो जागा झाला.
क्रिस्टोफरने क्षणाचाही विलंब न करता आपली जीप रस्त्याच्या मधोमध थांबवली. सिग्नल हिरवा होऊन वाहने पुढे जाण्यापूर्वीच तो गाडीतून बाहेर पडला आणि वेगाने धावत त्या व्हीलचेअरजवळ पोहोचला. त्याने अपंग व्यक्तीला धीर देत फक्त एवढेच म्हटले “आय गॉट यु” (मी तुम्हाला सांभाळतो). त्याने वेगाने व्हीलचेअरची हँडल्स पकडली आणि त्या व्यक्तीला सुखरूप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. ट्रॅफिक सिग्नल हिरवा होताच क्रिस्टोफर पुन्हा धावत आपल्या जीपकडे आला आणि निघून गेला. हा संपूर्ण बचावप्रसंग अवघ्या १० ते १५ सेकंदांत पार पडला.
Spider-man jumps out of vehicle and helps disabled pedestrian cross the street pic.twitter.com/QlOypgv5hC — made me smile (@mademe__smile) July 23, 2026
credit – social media and Twitter
जोन्सबोरो पोलीस विभागाने (Jonesboro Police Department) आपल्या अधिकृत फेसबुक पानावर या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज शेअर केला. पोलीस विभागाच्या वक्त्या सॅली स्मिथ यांनी सांगितले की, “माझ्या सात वर्षांच्या सेवाकाळात मी अशी हृदयस्पर्शी घटना कधीही पाहिली नव्हती.” हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युझर्सनी क्रिस्टोफरवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कॉमिक्समधील स्पायडर-मॅनचा प्रसिद्ध संवाद ‘विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी’ (मोठ्या ताकदीसोबत मोठी जबाबदारी येते) खऱ्या अर्थाने क्रिस्टोफरने जगून दाखवली आहे, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Aramco: होदेदाहचा सूड! येमेनी ड्रोन्सचा सौदीच्या अरामको रिफायनरीवर भयानक क्षेपणास्त्र हल्ला; अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित
या प्रसंगाबाबत बोलताना क्रिस्टोफरने सांगितले, “माझ्या शरीरात प्रचंड ॲड्रिनॅलिनचे प्रमाण वाढले होते. मला फक्त त्या माणसाला सुरक्षित ठिकाणी नेायचे होते. तो पोशाख घातलेला असताना हे सर्व घडल्यामुळे लोकांना ते अधिक मजेशीर वाटले.” क्रिस्टोफर लहानपणापासूनच मार्वल आणि स्पायडर-मॅनचा मोठा चाहता आहे. त्याने मार्वलचे निर्माते कै. स्टॅन ली यांचीही भेट घेतली होती. क्रिस्टोफरचे असे मानणे आहे की, जर त्याने तो कॉस्च्युम घातला नसता, तरीही एका गरजू व्यक्तीसाठी तो असाच धावून गेला असता. आजच्या काळात जिथे जगभरातून नकारात्मक बातम्या समोर येत असतात, तिथे अशा प्रकारच्या मानवतेचे आणि प्रसंगावधानाचे दर्शन घडवणाऱ्या घटना समाजातील माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात.