China-Bangladesh Relations : भारताला घेरण्याची नवी खेळी? बांगलादेशच्या 'या' हालचालीने वाढवली चिंता, तिस्ता प्रकल्पावर चीनचा डोळा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी
या दौऱ्यात तिस्ता नदी प्रकल्प सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. बांगलादेशने या प्रकल्पात चीनचा सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. परंतु ही बाब भारतासाठी चिंताजनक मानली जात आहे.
तिस्ता नदी भारताच्या सिक्कीम आणि पश्चिम बंगलादमध्यून वाहत बांगलादेशात प्रवेश करते. शिवाय हा परिसर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा परिसर भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेकच्या जवळ आगे. हा भाग भारताला ईशान्य राज्याशीं जोडतो. यामुळे चीनचा या भागात वाढता हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरु शकतो.
बांगलादेश चीनसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता असून तिस्ता हा प्रकल्प महत्त्वाचा मुद्दा ठरले. बांगलदेशने सुरुवातील तीस्ता प्रकल्पासाठी बांगलादेशने भारताकडे मदत मागितली होती. तीस्ता नदी बांगलादेशच्या लाखो लोकांच्या शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु यावरुन पश्चिम बंगालच्या विरोधामुळे दोन्ही देशांत वाद सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकार उन्हाळ्यात शेतीसाठी बांगलादेशच्या नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठे जलाशय बांधण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चीननेकडे मदत मागण्यात आली आहे. चीनने देखील आर्थिक निधी आणि तांत्रिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने याला तीव्र विरोध केला आहे.
तारिक रहमान यांच्या दौऱ्यात या प्रकल्पावर विशेष चर्चा होणार आहे. याचा भारत-बांगलादेश संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या रहमान यांच्या चीन दौऱ्याकडे भारत बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. आता जिनपिंग-रहमान यांच्या नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BrahMos Deal : इराण-इस्रायल तणावात यूएईची भारताकडे धाव; ब्रह्मोस खरेदीसाठी चर्चा सुरु






