Canada Crime News: भारतीय वंशाच्या व्यवसायिकाची हत्या, पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार; बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
कॅनडातील भारतीय वंशाचे व्यापारी दर्शन सिंग साहसी आणि यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचवेळी पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. दर्शन सिंग यांच्या हत्येची आणि पंजाबी गायकाच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगने घेतली आहे.बिश्नोई गँगचा गोल्डी ढिल्लन यांनी मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
बिश्नोई टोळीने दर्शन सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. “दर्शन सिंग साहसी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व्यवसायात सहभागी होता. आम्ही दर्शन सिंगकडे पैसे मागितले तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि आमचा फोन नंबर ब्लॉक केला.” त्यामुळे त्याची हत्या केल्याचे गोल्डी ढिल्लन याने सांगितले आहे. तर दर्शन सिंगने अब्जावधी रुपयांची कंपनी उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.” असं त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
त्याचवेळी पंजाबी गायक चन्नी नट्टन यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लनने स्वीकारली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक चन्नी नट्टन यांच्या घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ढिल्लन (लॉरेन्स बिश्नोई टोळी) यांनी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याने लिहिले, “सात श्री अकाल! मी गोल्डी ढिल्लन (लॉरेन्स बिश्नोई टोळी) आहे. काल गायक चन्नी नट्टन यांच्या घरी झालेल्या गोळीबारामागे सरदार खेडा हाच जबाबदार आहे.”
तसेच, टोळीतील दुसरा सदस्य लॉरेन्स गेन्स यांनी संगीत उद्योगाला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भविष्यात सरदार खेडा यांच्यासोबत काम करणारा किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणारा कोणताही गायक आपल्या नुकसानासाठी स्वतः जबाबदार असेल. आम्ही सरदार खेडा यांचे मोठे नुकसान करत राहू.” या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, घटनेचा तपास सुरू आहे.
बिश्नोई टोळीने एकाच दिवसात दोन घटना घडवून आणल्या आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांची जबाबदारी स्वीकारली. पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर, बाश्नोई एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांचे गायक चन्नी नट्टनशी कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व नव्हते, परंतु गायक सरदार खेरा यांच्याशी वाढत्या जवळीकतेमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले होते.
Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
गोल्डी ढिल्लनने या पोस्टमध्ये, “भविष्यात कोणत्याही गायकाने जर सरदार खेरा यांच्याशी कोणत्याही कामासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कोणताही संबंध ठेवला तर तो गायक त्यांच्या नुकसानीसाठी तो स्वतः जबाबदार असेल.” असा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टमध्ये सरदार खेरा यांना हानी पोहोचवण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.
बिश्नोई टोळी दहशतवादी संघटना म्हणून घोषित
कॅनडाच्या सरकारने लॉरेन्स बिश्नोई टोळीला त्यांच्या कारवायांसाठी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कॅनडामध्ये हिंसाचार, खंडणी आणि धमकी देण्यामध्ये टोळीचा सहभाग असल्याने सप्टेंबर २०२५ मध्ये हा निर्णय घेण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीला पाठिंबा देणे किंवा कॅनडामध्ये त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात सहभागी होणे आता गुन्हा आहे. शिवाय, कॅनडामधील टोळीची कोणतीही मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.






