Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MT Celestial : पाण्याच्या थंड बाटल्या अन मृतदेह! युद्धाच्या आगीत ओमान बंदरातील ‘त्या’ जहाजावरील थरकाप उडवणारी भीषण वास्तवता

भारतीय नागरिक निशांत अमृतनाथन यांचे वैद्यकीय गुंतागुंतीमुळे निधन झाले आहे. ते ओमानमधील दुक्म बंदरात नांगरलेल्या एमटी सेलेस्टियल या जहाजावर होते. जहाजाच्या कॅप्टनने मदतीसाठी आवाहन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 14, 2026 | 02:30 PM
indian sailor nishanth uirthanathan died aboard mt celestial oman duqm port

indian sailor nishanth uirthanathan died aboard mt celestial oman duqm port

Follow Us
Follow Us:
  • भारतीय खलाशाचा वेदनादायक अंत
  • बर्फाअभावी मृतदेहाची दुरावस्था
  • होर्मुझ संकटामुळे मदत मिळण्यास उशीर

Indian sailor died MT Celestial Oman : आंतरराष्ट्रीय समुद्रातून (Strait of Hormuz) एक अत्यंत वेदनादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. ओमानमधील दुक्म बंदरात (Duqm Port) नांगरलेल्या ‘एमटी सेलेस्टियल’ या मालवाहू जहाजावर तैनात असलेले भारतीय खलाशी निशांत उर्थनाथन (वय ३५ वर्षे) यांचे ११ जून रोजी गंभीर वैद्यकीय गुंतागुंतीमुळे आणि आजारपणामुळे निधन झाले. निशांत हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी होते आणि जहाजावर ‘सेकंड ऑफिसर’ म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर जहाजावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. जहाजावर मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीझर किंवा बर्फाची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने, मृतदेहाचे विघटन रोखण्यासाठी जहाजावरील इतर कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्यांचा वापर करत आहेत.

या अत्यंत गंभीर परिस्थितीची माहिती देत जहाजाच्या कॅप्टनने एक हृदयद्रावक व्हिडिओ जारी केला असून जागतिक पातळीवर मदतीची याचना केली आहे. कॅप्टनने व्हिडिओमध्ये अत्यंत भावूक होत सांगितले की, “आम्ही गेल्या दोन दिवसांपासून निशांत यांचा मृतदेह केवळ पाण्याच्या थंड बाटल्यांच्या आधारे जतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. जहाजावर मृतदेह जास्त काळ कुजण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही वैद्यकीय किंवा तांत्रिक सुविधा नाहीत. आमचा सहकारी आम्हाला सोडून गेला आहे आणि आता त्याचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला तातडीने आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे.” ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ने (FSUI) हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत केंद्र सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : G7 Summit : डेटा पॉलिसीवरून भारत-अमेरिका आमनेसामने; ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची फ्रान्समध्ये होणार महत्वपूर्ण भेट

मस्कटमधील भारतीय दूतावासाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

या घटनेची माहिती मिळताच मस्कटमधील भारतीय दूतावासाने (Embassy of India, Muscat) तात्काळ पावले उचलली आहेत. दूतावासाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय नागरिक निशांत उर्थनाथन यांचे वैद्यकीय कारणांमुळे निधन झाले असून, त्यांचे पार्थिव सध्या दुक्म बंदरावरील एमटी सेलेस्टियल जहाजावर आहे. भारतीय दूतावास या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीशी आणि ओमानमधील स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे.” निशांत यांचा मृतदेह लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारतात (तामिळनाडूला) त्यांच्या कुटुंबाकडे सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधला जात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम एशिया संकट की वजह से समुद्री नाविकों को किस तरह की मानवीय संकटों से गुज़रना पड़ रहा है! ओमान तट के पास से MT Celestial के कैप्टन की मदद की पुकार 35 साल के सेकंड ऑफिसर तमिलनाडु के निशांत उर्थनाथन 11 जून को बहुत बीमार पड़ने के बाद गुज़र गए। उनकी बॉडी 2 दिन से ज़्यादा… pic.twitter.com/F5jHWtbVAz — Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) June 14, 2026

credit – social media and Twitter

मात्र, सीमेन्स युनियनने आरोप केला आहे की, ८ जून रोजी निशांत यांची प्रकृती पहिल्यांदा खालावली होती, त्यांना सतत उलट्या होत होत्या. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कंपनीला आणि सागरी दळणवळण यंत्रणांना वैद्यकीय मदतीसाठी (Medical Evacuation) विनंती केली होती, परंतु प्रादेशिक तणावामुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि परिणामी ११ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : मृत्यूच्या दाढेतून परतले 233 प्रवासी! कोलंबोहून सिडनीला जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज; थरार कॅमेऱ्यात कैद

पश्चिम आशियातील युद्धाचा निष्पाप भारतीय खलाशांना फटका

सध्या पश्चिम आशियात आणि विशेषतः इराणच्या आसपास सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराला मोठा फटका बसला आहे. या युद्धाशी कोणताही संबंध नसलेल्या निष्पाप भारतीय खलाशांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आणि ओमानच्या आखाती प्रदेशात सध्या २०,००० ते २३,००० खलाशी अडकले आहेत, ज्यांच्यामध्ये बहुतांश नागरिक हे भारतीय आहेत. अनेक जहाजे मागच्या अनेक महिन्यांपासून समुद्रात एकाच ठिकाणी थांबून आहेत आणि त्यांना पुढे जाण्याची परवानगी मिळत नाहीये.

या संकटाची पार्श्वभूमी अशी आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखण्याची घोषणा केली होती. त्यानंतर इराणसोबतच्या वाटाघाटी अयशस्वी ठरल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला (US Navy) या सागरी क्षेत्राची पूर्ण नाकेबंदी (Blockade) करण्याचे आदेश दिले. अमेरिकेच्या या आर्थिक आणि लष्करी नाकेबंदीमुळे मालवाहू जहाजांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहाय्य मिळणे कठीण झाले आहे. याच आठवड्यात अमेरिकन नौदलाच्या थेट कारवाईत तीन भारतीय जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामध्ये दुर्दैवाने तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता, ज्यावर भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेधही नोंदवला आहे. निशांत यांच्या मृत्यूने या सागरी क्षेत्रातील मानवतावादी संकट किती भयानक झाले आहे, हे पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे.

Web Title: Indian sailor nishanth uirthanathan died aboard mt celestial oman duqm port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • India news
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

USA vs Iran : अमेरिकेशी कधीच समझोता नाही, होर्मूझ आमची ताकद; इराणचा स्पष्ट संदेश
1

USA vs Iran : अमेरिकेशी कधीच समझोता नाही, होर्मूझ आमची ताकद; इराणचा स्पष्ट संदेश

Us-Iran युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठा बदल; कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांचे महत्वपूर्ण विश्लेषण
2

Us-Iran युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठा बदल; कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांचे महत्वपूर्ण विश्लेषण

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
3

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त
4

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.