
India's air exercise with France and UAE
DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम! लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी
भारताच्या हवाई दलाने सरावासाठी सुखोई-३० MKI आमि जग्वार लढाऊ विमान, IL-78 एअर-टॅंकर आणि AEW&C विमानांची तैनात केली आहे. गुजरातच्या जामनगर आणि नलिया एअरबेसवर या विमानांनी उड्डाण घेतले आहे. अरब समुद्राजवळ पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी काही अंतरावर भारताचा हा युद्धाभ्यास सुरु आहे. अल-धाफ्रा हवाई तळावर राफेल आणि मिराज लढाऊ विमानांसह फ्रान्स आणि यूएईची काही विमाने या सरावात सहभागी होणार आहेत.
भारताने याअंतर्गत १० आणि ११ डिसेंबर रोजी एक नोटीस जारी केली आहे. यामध्ये कराची, पाकिस्तानपासून सुमारे २०० नॉटिकल मैल अंतरावरील क्षेत्र सरावासाठी निश्चित करण्यात आले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धोका मानला जात आहे. या सरावात तीव्र लढाऊ कौशल्य आणि युद्धाभ्यासांचे प्रदर्शने केले जाणार आहे. दोन दिवसांसाठी हा युद्धअभ्यास सुरु असेल. यातून भारताची ताकद जगसमोर येणार आहे. सध्या या सरावाकडे संपूर्णजगाचे लक्ष लागले आहे. याशिवाय पाकिस्तान देखील यावर बारकाईने नजर ठेवून आहे.
आधीच ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)ने पाकिस्तानचा थरकाप उडावला असताना भारताच्या या हवाई सरावामुळे तणाव अधिक वाढला आहे. सध्या पाकिस्तानने आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. भारताकडून पुन्हा हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान इतर देशांकडे मदतीची भीकही मागतच आहे. पण पाकिस्तान हा असा देशा आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरु शकते.
नुकतेच पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण दलांचे प्रमुख म्हणून असीम मुनीर यांची नियुक्त करण्यात आली. ज्यामुळे त्यांच्याकडे पाकिस्तानच्या तिन्ही हवाई, भू आणि नौदलाचे नेतृत्व आले आहे. यानंतर असीम मुनीर (Asim Munir) यांनी थेट भारताला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान हा शांतता प्रिय देश आहे, त्याच्यावर कोणीही हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल. मुनीरचे हे विधान युद्धाची चिथावणी म्हणून संबोधले जात आहे.
Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील
Ans: भारताने फ्रान्स आणि यूएईसोबत हवाई लढाऊ सराव सुरु केला असून याचा उद्देश त्रिपक्षीय सरंक्षण सहकार्य वाढवणे आहे.
Ans: भारत हिंद महासागरात हवई युद्धअभ्यास करत असून यासाठी कराची, पाकिस्तानपासून सुमारे २०० नॉटिकल मैल अंतरावरील क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.