DRDO चा संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम! लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी एस्केप यंत्रणेची यशस्वी चाचणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताकडे सध्या लाढाऊ विमानांमध्ये ही मार्टीन-बेकर एस्केप सीस्टिम आहे. मात्र भारताच्या या स्वदेशी प्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला नवी गती मिळाली आहे. चंदीगडमधील DRDOच्या टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरी ने या सिस्टिमची काल चाचणी घेतली. ही चाचणी ताशी ८०० किलोमीटर वेगाने घेण्यात आली. यावेळी कॅनोपी सेव्हरन्स इजेक्शन सिक्वेन्सिंग आणि एअरक्रू रिकव्हरीची पडताळणी अचूक करण्यात आली आहे.
सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या तेजस फायटर जेट आणि AMCA सारख्या अत्याधुनिक लढाभ विमानांसाठी प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्वदेशी इजेक्शन प्रणालीमुळे भविष्यात भारताला परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करता येईल. तसेच युद्धभूमीवर आणि आपत्कालीन परिस्थिती पायलटचे प्राण वाचवण्यासाठी ही प्रणाली अधिक विश्वासार्ह ठरणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे, ADA, HAL आणि DRDO चे आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ही कामगिरी भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी मोठी टप्पा असल्याचे म्हटले आहे. DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी देखील संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सध्या जगातील अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांकडे अशा हाय-स्पीडने होणाऱ्या डायनॅमिक इजेक्शनची क्षमता आहे. आता या श्रेणीमध्ये भारताचेही नाव जोडले गेले आहे.
Defence Research and Development Organization (DRDO) has successfully conducted a high-speed rocket-sled test of fighter aircraft escape system at precisely controlled velocity of 800 km/h- validating canopy severance, ejection sequencing and complete aircrew-recovery at Rail… pic.twitter.com/G19PJOV6yD — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) December 2, 2025
भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन
Ans: भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) चंगदीगडमध्ये लढाऊ विमानासाठीच्या स्वदेशी इजेक्सशन सीटची यशस्वी चाचणी केली आहे.
Ans: DRDO ने स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीमध्ये कॅनोपी सेव्हरन्स इजेक्शन सिक्वेन्सिंग आणि एअरक्रू रिकव्हरीची पडताळणी अचूकपणे केली आहे,
Ans: भारताच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या कामगिरीचे कौतुक केले असून ही चाचणी भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
Ans: DRDO च्या स्वदेशी इजेक्सशन सीटच्या चाचणीचा भारताच्या तेजस आणि AMCA या अत्याधुनिक लढाऊ विमानांना फायदा होईल.






