Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या चिनाब नदीच्या नव्या प्रकल्पावरुन पाकिस्तानने भारताला थेट धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 05:38 PM
India Pakistan Conflict

India Pakistan Conflict

Follow Us
Follow Us:
  • सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव
  • भारताच्या या निर्णयावर भडकला पाकिस्तान
  • आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप
Indus Water Treaty : भारत-पाकिस्तानात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला होता. यामुळे आधीच थिरबिथर झालेल्या पाकिस्तान (Pakistan) भारताच्या आणखी एका निर्णयाने पुरता घाबरला आहे. भारत चिनाब नदीचे पाणी व्यास नदीकडे वळवणार आहे. यामुळे पाकिस्तानला पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसावे लागेल. यावरुन पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, भारत लवकरच हिमाचल प्रदेशात लिंक-३ प्रकल्पावर काम सुरु करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिनाब नदीचे अतिरिक्त पाणी व्यास नदीत वळवले जाणार आहे. यामुळे भारताला उपबल्ध जलस्त्रोतांचा अधिक वापर करता येईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी २६. २ अब्ज रुपयांचे गुंतवणूक करण्यात आली आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भारताचे चिनाब नदीच्या पाण्यावर पूर्ण नियंत्रण राहिल. मात्र, ही बाब पाकिस्तानला अस्वस्थ करत आहे. यामागचे कारण म्हणजे १९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू पाणी वाटप करारानुसार, सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्याचा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. यामुळे चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला तर पाकिस्तानच्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप

दरम्यान पाकिस्तानने भारताच्या या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. चिनाब नदीचे पाणी व्यास नदीकडे वळवणे हे सिंधू पाणी वाटाप कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच आंतराराष्ट्री जल कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकने भारतावर केला आहे.

पाकिस्तानच्या मते, भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांच्या अन्न आणि जल सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांनी भारताची ही कृती खपवून घेतली जाणार नाही, आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत असाही इशारा दिला आहे.

भारताची भूमिका

परंतु पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) स्थगित करुन स्पष्ट केले होते की, भारताविरोधी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही.

Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त

Web Title: Indus waters treaty pakistan reacts to indias chenab river decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Indus Water Treaty
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
1

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
2

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त
3

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट
4

Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.