India Pakistan News in Marathi : इस्लामाबाद/नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. सिंधू पाणी कराराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून यावर व्हिएन्नामध्ये कार्यवाही होणार आहे. परंतु या कार्यवाहीला उपस्थित राहण्यास भारताने नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, येत्या आठवड्यात १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान व्हिएन्नामध्ये सिंधू पाणी करारावर कार्यवाही होईल. यासाठी पाकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे, मात्र भारताने यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानन हा करार पुन्हा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा सतत उपस्थित करत आहे. पण भारताने यावर बोलण्यास नकार दिला आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये अनेक निरापराध लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सबक म्हणून सिंधू पाणी करार स्थगित केला होता. यानंतर पाकिस्तानने हे प्रकरण लवाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेते होते. परंतु भारताने न्यायालयाने निर्णय नाकारले होते. सध्या पुन्हा एकदा पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केला असून व्हिएन्नामध्ये कार्यवाहीची घोषणा केली आहे.
भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाते. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण आहे. पण पहलगाम हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरत हा करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.
करार स्थगित झाल्यापासून पाकिस्तानने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा करार पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु यावर त्यांना निराशा मिळत आहे. भारताने हा करार पुन्हा पुनर्सुचित करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादविरोधी भूमिका घेण्यास आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पण अद्याप दहशतवादवर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.
शिवाय नुकतेच भारताच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला होता. यामध्ये १३ जणांच्या मृत्यूची नोंद तर २० हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांपैकी एकाचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय या हल्ल्याच्या एक दिवसानंतप पाकिस्तानच्या राजधानीमध्ये देखील असाच स्फोट झाला, ज्यासाठी भारताला जबाबदार धरण्यात आले. यामुळे पुन्हा दोन्ही देशातील तणाव वाढला आहे.
Indus Waters Treaty : भारत खरंच सिंधू नदीचं पाणी रोखेल का? सरकारच्या दाव्यात किती तथ्य? वाचा सविस्तर






