Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त
दरम्यान ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे एका उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय जल परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण मंत्री डॉ. मुसादिक मालिक यांनी भारतावर हल्ला चढवला. त्यांनी भारतावर पाकिस्ताने संयुक्त पाणी संसाधनाचे राजकारण केल्याचा आरोप केला.
त्यांनी म्हटले की, भारताने एकतर्फी निर्णय घेतला असून यामुळे जागतिक अन्न सुरक्षा, आणि हवामान बदलाचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. यामुळे भारताने सिंधु पाणी कराराचे पालन करावे आणि आंतरराष्ट्रीय नियम मानावेत असे आवाहन केले. मलिक यांच्या मते, भारताने घेतलेला निर्णयामुळे जगभरातील इतर देशांसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दरम्यान भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अदांधुंद गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाय उसळली होती. या पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack) दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानविरोधात काही कडक निर्णय घेतले होते.
यामध्ये भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु पाणी वाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केला होता. पहलगाम हल्ल्याबाबत शून्य सहनशीलता धोरण दाखवून देत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. परंतु पाकिस्तानने याला युद्धाची कृती मानले होते. तसेच यावरुन भारताला थेट युद्धाची धमकी देण्यात आली.मात्र, भारत आपल्या शून्य सहनशीलता धोरणावर ठाम आहे.
भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधु जल करारावरस्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाईल. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण असेल.
हे देखील वाचा : एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
Ans: २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेत काही आक्रमक निर्णय घेतले होते. यातीच एख म्हणजे सिंधु पाणी वाटप करार स्थगिती.
Ans: ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे एका उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय जल परिषेदेत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला. पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण मंत्री डॉ. मुसादिक मालिक यांनी भारत सामूहिक जलसंपत्तीचे राजकरण करत असल्याचा आरोप केला. ही एकतर्फी कारवाई असून यामुळे जगातील इतर देशांसाठी धोका निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.






