Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

Iran Earthquake Update : तेहरान विद्यापीठाच्या भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये ५.० तीव्रतेच्या धक्क्क्यांनी जमिनी हादरली आहे. इराणच्या खुजेस्तान प्रदेशात हा भूकंप झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 10:44 AM
Iran Earthquake

Iran Earthquake

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या खुजेस्तानमध्ये ५.० तीव्रतेचे जोरदार हादरे
  • नागरिकांमध्ये घबराट
  • जीवित किंवा वित्तहानीबाबत अस्पष्टता
Iran Earthquake News in Marathi : एकीकडे अमेरिकेशी संघर्ष सुरु असताना इराणवर मोठे संकट उभारले आहे. इराणच्या खुजेस्तान प्रदेशात रविवारी (१९ जुलै) ५.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे धक्के परिसरातील अनेक भागांमध्ये जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेहरान विद्यापीठाच्या भूकंप विज्ञान केंद्रानेही याची पुष्टी केली आहे.

Russia Ukraine War : युद्ध आणखी भडकले! युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला; प्रत्युत्तरात कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा

भूकंपाची खोली

तेहरान विद्यापीठाच्या भूकंपशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे १२ किलोमीटर खोलीवर होता. कमी खोलीवर होणारे भूकंप सामान्यत: पृथ्वीच्या पृष्ठभागावर तीव्रतेने जाणवतात. यामुळे खुजेस्तानच्या सरंद आणि आसपासच्या भागात जोरदार हादरे बसले. यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

सरकार सतर्क, कोणतेही नुकसान नाही

इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या भूकंपानंतर स्थानिक सरकार अलर्टमोडवर आहे. परंतु या भूकंपात कोणतीही जावित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपत्कालमनी पथकांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे.

इराणमध्ये सतत भूकंप

इराण हा जगातील सर्वात भूकंपप्रवण देशापैकी एक मानला जातो. आकडेवारीनुसार, गेल्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ८७ भूकंपांतीन नोंद झाली होती. यातील बहुतेक भूकंप ३ तीव्रतेपेक्षा कमी होते. यामुळे कोणताही धोका नव्हता.

यापूर्वी मार्च २०२५ ते मार्च २०२६ च्या कालवधीत इराणमध्ये २.५ तीव्रतेचे तब्बल २,३८० भूकंप नोंदवले गेले. यातील काही भूकंपाची तीव्रता ४ पेक्षा अधिक होती, तर काही भूकंपांनी ५.० रिश्टर स्केल तीव्रता गाठली होती.

का होतात भूकंप?

तज्ज्ञांचे मते, इराण हा अरबियन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सवर स्थित आहे.  या प्लेट्स सतत एकमेकांवर धडकत असतात, ज्यामुळे जमिनीखाली ताण निर्माण होतो. या तणावामुळे भूकंप घडतात.

#Breaking
🚨Strong Ground Shaking Reported Across Southwestern #Iran
📌Residents across Iran’s Khuzestan Province are reporting #earthquake-like shaking at approximately 5:55–6:00 a.m. local time. https://t.co/3vs71asOoB
📍 Report From…
• Ahvaz • Dezful • Shush •… pic.twitter.com/BmKxbRgQeL
— ⚡️🌎 World News 🌐⚡️ (@ferozwala) July 19, 2026

…तर UN वरील विश्वास उडेल; UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर; संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा

बातमी अपडेट होत आहे.

Web Title: Iran earthquake 5 0 magnitude earthquake hits khuzestan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Earthquake
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
4

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.