
iran fires ballistic missiles kuwait bahrain us military bases strait of hormuz war 2026
Iran fires missiles Kuwait Bahrain 2026 : मध्य पूर्वेमध्ये (Middle East) पुन्हा एकदा युद्धाचा भीषण भडका उडाला आहे. जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त (Strait of Hormuz) अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष आता थेट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युद्धात रूपांतरित झाला आहे. अमेरिकेने इराणचे ड्रोन पाडल्यानंतर आणि त्यांच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्यानंतर, संतप्त झालेल्या इराणने थेट कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकी सैन्याच्या तळांना लक्ष्य केले आहे. या अचानक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात (Gulf Region) युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, इराणी लष्कराने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने एकापाठोपाठ एक अशी ७ महाकाय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला अत्यंत नियोजित होता. मात्र, अमेरिकेच्या प्रगत ‘क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली’ने (Missile Defense System) आपली ताकद दाखवत यापैकी ६ क्षेपणास्त्रे लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच हवेत रोखून नष्ट केली. तांत्रिक बिघाड किंवा दिशा चुकल्यामुळे सातवे क्षेपणास्त्र आपल्या नियोजित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. सुदैवाने, या मोठ्या हल्ल्यात एकाही अमेरिकी सैनिकाला दुखापत झाली नसल्याचे वॉशिंग्टनने स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai Royal Family: दुबईचे राजघराणे बनले सोन्याचा पिंजरा; का पळून जात आहेत राजकन्या आणि राण्या? सुनेच्या अटकेने खळबळ
या मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्याची पटकथा काही तासांपूर्वीच समुद्रात लिहिली गेली होती. अमेरिकन नौदलाने दावा केला होता की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने जाणारे चार इराणी आत्मघातकी ड्रोन जागतिक सागरी वाहतुकीसाठी मोठा धोका निर्माण करत होते. त्यामुळे अमेरिकी सैन्याने ते ड्रोन समुद्रात पाडले. या कारवाईचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने थेट इराणच्या ‘गोरुक’ आणि ‘केशम’ बेटांवर असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या किनारी रडार प्रणाली केंद्रांवर (Coastal Radar Systems) क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. आपल्या रडार यंत्रणेवर झालेल्या या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठीच इराणने थेट बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकी तळांवर ७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
BREAKING: In response to the recent U.S. Navy airstrikes against IRGC Navy facilities on Qeshm Island and at Goruk in the Strait of Hormuz, the IRGC Aerospace Force has launched at least two Fateh-110 precision-guided short-range ballistic missiles toward Ali Al-Salem Air Base in… pic.twitter.com/TAB5NzUS5K — Babak Taghvaee – The Crisis Watch (@BabakTaghvaee1) June 6, 2026
credit – social media and Twitter
हल्ल्यानंतर इराणच्या सरकारी माध्यमांनी आणि लष्कराने मोठा दावा केला आहे. त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकी नौदलाच्या ‘पाचव्या नौदलाच्या’ (US Fifth Fleet) मुख्य कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे तेहरानचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकेने इराणचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनच्या मते, इराणचे दावे हे केवळ स्वतःच्या जनतेला दाखवण्यासाठी केलेले प्रोपागंडा (प्रचारकी) आहेत आणि अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी पायाभूत सुविधांचे किंवा जहाजांचे नुकसान झालेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र
हा संघर्ष केवळ अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित नसून, याचा थेट फटका भारतासह संपूर्ण जगाला बसू शकतो. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेखा मानली जाते. जगातील एकूण तेल व्यापाराचा आणि एलपीजी गॅसचा एक तृतीयांश पेक्षा जास्त भाग याच अरुंद सागरी मार्गातून वाहून नेला जातो. भूराजकीय तज्ज्ञांच्या मते, जर हा लष्करी संघर्ष असाच सुरू राहिला किंवा इराणने होर्मुझचा मार्ग रोखला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर गगनाला भिडतील. सध्या, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संपूर्ण आखाती प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्कराला ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे.