Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: युद्ध थांबलं नाही! ट्रम्प यांनी हात पुढे केला, पण इराणने होर्मुझमध्ये ‘ट्रिगर’ दाबला, UKMTO Shipवर अंधाधूंद गोळीबार

Iran Ship Firing: अमेरिकेने युद्धविराम जाहीर केल्यानंतर काही तासांतच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर गोळीबार केला. ब्रिटिश लष्कराने सांगितले की, या हल्ल्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 22, 2026 | 01:40 PM
iran fires on ship in hormuz hours after trump ceasefire declaration 2026

iran fires on ship in hormuz hours after trump ceasefire declaration 2026

Follow Us
Follow Us:
  • शस्त्रसंधीला वाटाण्याच्या अक्षता
  • कंटेनर जहाजावर विनाकारण हल्ला
  • शांतता चर्चा फिस्कटली

Donald Trump Iran ceasefire violation : जागतिक राजकारणात शांततेची अपेक्षा असतानाच पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून युद्धाच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शस्त्रसंधीची (Ceasefire) घोषणा केली खरी, पण इराणने या घोषणेला केराची टोपली दाखवत आपली लष्करी ताकद दाखवून दिली आहे. बुधवारी पहाटे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने केलेल्या या धाडसी हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा पश्चिम आशियाकडे वळवले आहे.

शांततेच्या चर्चेला इराणची ‘चपराक’

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर करून काही तास उलटत नाहीत तोच, बुधवारी सकाळी ७:५५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका मोठ्या कंटेनर जहाजाला लक्ष्य केले. ब्रिटीश लष्कराच्या युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) केंद्राने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या निमलष्करी दलाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गोळीबार सुरू केला. हा हल्ला इतका अचानक होता की जहाजावरील कर्मचाऱ्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. सुदैवाने, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: इराणचा ‘खोरमशहर’ प्रहार! क्षेपणास्त्रे घेऊन रिव्होल्यूशनरी गार्ड्स रस्त्यावर; ट्रम्पचा इशारा अन् अनपेक्षित सीझफायर

हल्ल्यामागील ‘बदल्याचे’ राजकारण

हा केवळ एक लष्करी हल्ला नसून इराणने दिलेले एक धोरणात्मक उत्तर आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकन लष्कराने एका इराणी कंटेनर जहाजावर गोळीबार करून ते ताब्यात घेतले होते, तसेच हिंद महासागरात इराणचा तेल व्यापार रोखण्याचा प्रयत्न केला होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी इराणने आता शस्त्रसंधीच्या काळातच प्रतिहल्ला चढवला आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने या हल्ल्याचे वर्णन “होर्मुझवर आमचे कायदेशीर नियंत्रण सिद्ध करणे” असे केले आहे. यामुळे इराणला या सागरी मार्गावर कोणाचेही वर्चस्व मान्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.

🇮🇷🇴🇲BREAKING | An IRGC gunboat approached a container vessel 15 nautical miles northeast of Oman and fired at it, causing heavy damage, according to UKMTO. pic.twitter.com/GN6Wrv7Ljf — Visioner (@visionergeo) April 22, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Blockade: इराणला भिकेला लावण्याची अमेरिकेची तयारी; बेझंट म्हटले, ‘आता तेल विहिरींवर ‘टाळे’ लागणार आणि खजिना होणार रिकामा’

पाकिस्तान चर्चेचे अपयश अन् वाढता अविश्वास

या हल्ल्याचा थेट संबंध पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेच्या अपयशाशी जोडला जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने दोन्ही देशांमधील अविश्वास पराकोटीला पोहोचला आहे. इराणने केलेली ही कृती शस्त्रसंधीचे थेट उल्लंघन मानली जात असून, यामुळे ट्रम्प प्रशासनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. या अकारण हल्ल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विम्याचे दर आणि इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीनंतर कोणता हल्ला केला?

    Ans: ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांत इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी कंटेनर जहाजावर गोळीबार केला.

  • Que: या हल्ल्यात जीवितहानी झाली आहे का?

    Ans: सुदैवाने ब्रिटीश लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या अचानक आणि भीषण हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

  • Que: इराणने या हल्ल्याचे समर्थन कसे केले?

    Ans: इराणने म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर त्यांचे कायदेशीर नियंत्रण लागू करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Web Title: Iran fires on ship in hormuz hours after trump ceasefire declaration 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?
1

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
2

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले
3

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO
4

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.