Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Kuwait Tension : कुवैतच्या ‘त्या’ कारवाईने इराण संतप्त; भारताच्या दौऱ्यावर असातानच अराघची यांनी दिला कडक इशारा

Iran Kuwait Tension : इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान या दौऱ्यावर असातानाच त्यांनी कुवैतवर जोरदार हल्ला चढवला आहे. कुवैतला त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 09:44 AM
FM Araghchi Slams Kuwait from India over 4 Iranians Detention

FM Araghchi Slams Kuwait from India over 4 Iranians Detention

Follow Us
Close
Follow Us:
  • कुवैतवर संतापला इराण
  • अराघची यांनी भारताच्या भूमीवरुन दिली युद्धाची धमकी
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Iran Foreign Minister Abbas Araghachi in India : नवी दिल्ली : अमेरिकेशी संघर्षादरम्यान इराण(Iran)चे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. ब्रिक्स देशांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होण्यासाठी अराघची १३ मे रोजी भारतात दाखल झाले. मात्र भारतात येताच त्यांनी खळबळजनक विधान केले आहे. भारताच्या भूमीवर अराघची यांनी कुवैतला गंभीर इशारा दिला आहे. कुवैत वर गंभीर आरोप केले आहे. पर्शियन आखातात कुवैतने एका इराणी बोटीवर बेकायदेशीरपणे हल्ल्या केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ

नेमकं काय आहे प्रकरण?

मंगळवारी (१२ मे) कुवैतने दावा केला होता की, त्यांच्या समुद्री हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक केली आहे. कुवैतने दिलेल्या माहितीनुसार, हे ४ही संशयित इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) शी संबंधित आहेत. त्यांनी चीनद्वारे विकसित केल्या जाणाऱ्या बंदराजवळ घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अराघची यांचा संताप

मात्र इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी कुवैतचे सर्व आरोप फेटाळले. भारतात येताच च्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, कुवैतने जाणीवपूर्वक आमच्या निष्पाप नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ज्या बेटावरुन अमेरिकेने आमच्यावर हल्ले केले, त्याच ठिकाणी ही कारवाई होणे संशयास्पद असल्याचे अराघची यांनी म्हटले.

अराघची यांचा कुवैतला कडक इशारा

अराघची यांनी कुवैतला कडक शब्दात सुनावले. तसेच त्यांनी ताब्यात घेतलेल्या ४ इराणी नागरिकांना कोणत्याही अटीशिवाय सोडण्याचा इशारा दिला. याशिवाय कुवैतने घुसखोरी आणि शस्त्रास्त्र बाळगण्याचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. इराणला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

अराघची यांचा भारत दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात प्रचंड अस्थिरता पसरली आहे. याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली आहे, ज्यामुळे  जागतिक स्तरावर उर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

In clear attempt to sow discord, Kuwait has unlawfully attacked an Iranian boat and detained 4 of our citizens in the Persian Gulf. This illegal act took place near island used by the U.S. to attack Iran. We demand immediate release of our nationals and reserve right to respond. — Seyed Abbas Araghchi (@araghchi) May 13, 2026

ब्रिक्स बैठक

१४ ते १५ मे रोज नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच वेळी दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड चीनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकांकडे लागले आहे. या बैठकांमुळे राजनैतिक स्तरावर बदल होण्याची शक्यता आहे.

Trump China Visit : ट्रम्प यांच्या चीन भेटीपूर्वीच ‘ड्रॅगन’चा अमेरिकेला सज्जड दम; तैवानसह ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची दारे बंद

Web Title: Iran foreign minister abbas araghachi in india iran kuwait tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Brics Council
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi: वादळ येत आहे, पण भारत सज्ज! मोदींनी UAEमध्ये गाडलं ‘ऊर्जा संकटाचं’ भूत, भारत होईल चिंतामुक्त; पाहा नेमकं काय घडलं?
1

PM Modi: वादळ येत आहे, पण भारत सज्ज! मोदींनी UAEमध्ये गाडलं ‘ऊर्जा संकटाचं’ भूत, भारत होईल चिंतामुक्त; पाहा नेमकं काय घडलं?

Chenab River : 2030 पर्यंत पाकिस्तान होणार कोरडा; वाचा चिनाब नदीवरून कसा आवळला भारताने पाकड्यांच्या गळा?
2

Chenab River : 2030 पर्यंत पाकिस्तान होणार कोरडा; वाचा चिनाब नदीवरून कसा आवळला भारताने पाकड्यांच्या गळा?

Nepal-India Border : भारतासमोर नमले बालेन सरकार? 30 दिवसांच्या मर्यादेचं सत्य आलं समोर; ‘असा’ असेल बॉर्डरवर नवा नियम
3

Nepal-India Border : भारतासमोर नमले बालेन सरकार? 30 दिवसांच्या मर्यादेचं सत्य आलं समोर; ‘असा’ असेल बॉर्डरवर नवा नियम

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ 
4

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.