Trump China Visit : ट्रम्प यांच्या चीन भेटीपूर्वीच 'ड्रॅगन'चा अमेरिकेला सज्जड दम; तैवानसह 'या' मुद्द्यांवर चर्चेची दारे बंद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संदेश दिला आहे की, अमेरिकेला द्विपक्षीय संबंध सुधारण्याची इच्छा असले, तर इतर मुद्द्यांपासून लांब रहावे. यामध्ये
ट्रम्प यांचा हा दौरा अमेरिका (America) इराण संघर्षादरम्यान होत आहे. यावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु इराणच्या मुद्द्यावर कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर दौऱ्यापूर्वी त्यांनी इराणला योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.
सध्या हा दौरा जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ही भेट जागतिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी की तणाव आणखी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






