Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका! इराणचा UAE च्या तेल बंदरावर हल्ल्याने खळबळ; ३ भारतीय जखमी

Iran attack on UAE Port Fujairah : आखातील देशांतील युद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणने यूएईच्या तेल बंदरावर हल्ला केला असून जगभरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाल्याचे वृत्त आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 11:09 AM
Iran Strike on UAE Port Fujairah

Iran Strike on UAE Port Fujairah

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वे पेटणार
  • इराणचा यूएईच्या तेल बंदरावर हल्ला
  • ३ भारतीय जखमी
Iran Strike on UAE Oil Port : दुबई/तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची चाहूल लागली आहे. इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या तेल बंदरांना लक्ष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने यूएईच्या सर्वात महत्त्वाच्या तेल बंदर फुजैराह वर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे मोठी आग लागली असून यामध्ये तीन भारतीय जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Naval Escalation : होर्मुझची खाडी पेटली! इराणचा अमेरिकन युद्धनौकावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा, युद्धाचा भडका उडणार?

इराण(Iran)ने सोमवारी (०४ मे) यूएईच्या फुजैराह झोनमधील तेल बंदरावर एकाच वेळी अनेक क्रूझ आणि क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय ड्रोन हल्लेही करण्यात आले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने यातील १२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, ३ क्रूझ क्षेपणास्त्र, ४ ड्रोन यशस्वीरित्या  हाणून पाडली आहे. परंतु एक ड्रोन फुजैराच्या पोर्टला धडकला. यामुळे भीषण स्फोट झाला आणि आग लागली.

भारताची चिंता वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये तीन भारतीय जखमी झाले आहेत. यूएईतील भारतीय दूतावासाने याची पुष्टी केली आहे. सध्या तीन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालय या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Three Indian nationals have been injured in today’s attacks in Fujairah. We are in touch with local authorities for ensuring adequate medical care and welfare of the affected Indian nationals.@MEAIndia @cgidubai — India in UAE (@IndembAbuDhabi) May 4, 2026

युद्धविरामाचे उल्लंघन

अमेरिका (America) इराण मध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तात्पुरता युद्धविराम लागू करण्यात आला होता. परंतु या हल्ल्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चाही ठप्प झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा तणावाची चिन्हे दिसू लागली आहे.

यूएईची प्रतिक्रिया

इराणच्या या हल्ल्यावर यूएईने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हल्ल्याचा निषेध करत यूएईने, राष्ट्राची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत असे म्हटले आहे.

फुजैराह बंदराचे महत्त्व

यूएईचे हे बंदर ओमानच्या आखाताजवळ आहे. यामुळे यूएईला इराणच्या नियंत्रणातील स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Homuz) ला वळसा घालून जागतिक बाजारपेठेत तेल निर्यात शक्य होते. हे बंदर यूएईच्या तेल उद्योगासाठी आणि अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा कणा मानले जाते. या बंदरावरील हल्ल्यामुळे यूएईच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहचू शकतो.

मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थिती फुजैराह सारख्या बंदरावर हल्लाकरण्यात आला आहे. यामुळे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. या वाढत्या तणावामुळे पुन्हा आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊन जागतिक बाजारात तेलाच्या किमती भडकू शकतात.

Donald Trump यांचे वर्चस्व संपणार? इराणसोबतच्या वादामुळे लोकप्रियतेत घट, आगामी निवडणुकीपूर्वीच सर्वेक्षणाने उडवली झोप

Web Title: Iran miisle strike on uae oil hub 3 indian workers injured in fujairah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Iran News
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
1

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.