Donald Trump यांचे वर्चस्व संपणार? इराणसोबतच्या वादामुळे लोकप्रियतेत घट, आगामी निवडणुकीपूर्वीच सर्वेक्षणाने उडवली झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
विशेष म्हणजे आगामी निवडणुकांपूर्वीच हा रिपोर्ट जाहीर झाला असून याने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या रिपोर्टनुसार, ६६% अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ट्रम्प यांची लोकप्रियता आता केवळ ३७% वर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण ३९% वर होते. परंतु इराणसोबतच्या बादामुळे हे प्रमाण २ टक्क्यांनी घसरले आहे. ही रेटिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कमी रेटिंग मानली जात आङेत.
इराणसोबत गेल्या दोन महिन्यापासून तीव्र संघर्ष सुरु आहे. याचा थेट फटका ट्रम्प यांच्या प्रतिमेला बसत आहे. या युद्धाला केवळ ३३% लोकांनीच समर्थन दिले आहे. बाकी ६६% लोकांंनी मध्यपूर्वेतील परिस्थिती हातळण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणावर तीव्र टीका केली आहे. या युद्धामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे महागाईत वाढली झाली आहे. ज्याचा परिणाम थेट ट्रम्प यांच्या रेटिंवर झाला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. महागाईच्या मुद्द्यामुळे त्यांचे रेटिंग ५ अंकानी घसरुन २७% वर आले आहे. वाढत्या राहणीमानाच्या खर्चावर ७६% लोकांनी रोष व्यक्त केला आहे.
याशिवाय २३ ते ३३% लोकांनी ट्रम्प यांच्या गुन्हेगारी, महागाई, नागरिक अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर राजकीय पक्षांचाही अविश्वास वाढत चालला आहे. याशिवाय आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या मुद्द्यावरुनही ५१ % अमेरिकी नागरिकांनी रिपब्लिकन पक्षावर अविश्वास दाखवला आहे.
ट्रम्प यांच्या लोकप्रियतेते एवढी घट, आगामी काळात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धोक्याची मानली जात आहे. जर रिपब्लिकन पक्षातील नेत्यांचा त्यांना पाठिंबा असला तरी सर्वसामान्या नागरिकांची मते बदलतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पक्षातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
Ans: एका सर्वेक्षणानुसार, इराणसोबतच्या युद्धामुळे, देशांतर्गत वाढत्या महागाई आणि राहणीमानाच्या खर्चामुळे, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियेतत घट होताना दिसत आहे.
Ans: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प यांची एकूण लोकप्रियता ३७% घसरली आहे. त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी होत असल्याने येत्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठी हार सहन करावी लागू शकते.






