Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी

इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ म्हणाले की, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरान राजनैतिक चर्चेसाठी तयार आहे आणि पूर्वीच्या संघर्षांच्या तुलनेत इराणच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2026 | 01:51 PM
iran president qalibaf warning to donald trump us war strategy 2026

iran president qalibaf warning to donald trump us war strategy 2026

Follow Us
Follow Us:
  • गालिबाफ यांचा अंतिम इशारा
  • चर्चेसाठी तयार, पण सैन्य सतर्क
  • रणनीतीचा विजय

Mohammad Baqer Qalibaf Iran US warning : मध्य-पूर्वेतील तणाव (Iran US War) आता अशा वळणावर येऊन पोहोचला आहे, जिथून परतणे कठीण दिसत आहे. इराणचे संसद अध्यक्ष आणि प्रभावशाली नेते मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी रविवारी रात्री देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट आणि उघड धमकी दिली आहे. “जर अमेरिकेने आमच्या विरोधात किंचितही चुकीचे पाऊल उचलले, तर इराणचा प्रहार इतका जोरदार असेल की तो शत्रूला सावरण्याची संधीही देणार नाही,” अशा कडक शब्दांत गालिबाफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सामर्थ्याच्या स्थानावरून वाटाघाटी

गालिबाफ यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, इराण राजनैतिक चर्चेसाठी (Diplomatic Talks) नक्कीच तयार आहे, पण ही चर्चा शरणागती पत्करून केली जाणार नाही. “आम्ही रणांगणावर विजय मिळवला आहे आणि आता आम्ही सामर्थ्याच्या स्थानावरून वाटाघाटी करण्यास तयार आहोत,” असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. इराणच्या या भूमिकेमुळे आता अमेरिकेला आपली रणनीती बदलावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणने आपले सैन्य ‘हाय-अलर्ट’वर ठेवले असून, कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : ‘मूर्खाच्या ट्विटवरून मार्ग उघडणार नाही!’ इराण आक्रमक; होर्मुझ बंद होताच ‘oil prices’ अनियंत्रित

“अमेरिका शक्तिशाली आहे, पण आमची रणनीती सरस!”

गालिबाफ यांनी अत्यंत वास्तववादी भूमिका मांडताना मान्य केले की, अमेरिकेकडे इराणपेक्षा जास्त पैसा, संसाधने आणि जगभरात युद्धे लढण्याचा अनुभव आहे. मात्र, त्यांनी अमेरिकेच्या कमकुवत नसवर बोट ठेवले. ते म्हणाले, “अमेरिकेकडे संसाधने आहेत, पण त्यांच्याकडे रणनीती नाही. आम्ही हे युद्ध अशा प्रकारे लढलो की आमच्या सुनियोजित रणनीतीमुळे आम्ही शत्रूला मागे ढकलले आहे.” गालिबाफ यांच्या मते, इराणची आक्रमक क्षमता आणि रणनीती ही पूर्वीच्या ‘लादलेल्या युद्धां’पेक्षा कित्येक पटीने प्रगत झाली आहे.

🚨🇮🇷 Mohammad Bagher Qalibaf Warned US Over Hormuz Qalibaf says he issued a direct warning to the US delegation in Islamabad. He said any movement of a US minesweeper in the Strait of Hormuz would trigger a response. “Iran would fire,” he warned. He claimed US forces… pic.twitter.com/VvK8iirGRK — Conflictory X (@Conflictory_X) April 18, 2026

credit – social media and Twitter

युद्धविरामाचे प्रयत्न धोक्यात?

सध्या जागतिक स्तरावर युद्धविरामाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र हे प्रयत्न अत्यंत नाजूक स्थितीत आहेत. अशा वेळी गालिबाफ यांनी “आम्ही पूर्णपणे तयार आहोत” असे म्हणणे, हे अमेरिकेसाठी आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही चिथावणीला भीक घालणार नाहीत आणि जर त्यांच्या सार्वभौमत्वाला धक्का लागला, तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RELOSA : 3000 सैनिक, 10 जेट विमाने, 5 युद्धनौका! होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

जागतिक राजकारणावर परिणाम

इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गालिबाफ यांनी रणांगणावरील विजयाचा जो दावा केला आहे, त्याने इराणच्या मित्र राष्ट्रांमध्ये उत्साह संचारला आहे, तर पाश्चात्य देशांची चिंता वाढली आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात असून, ट्रम्प प्रशासन या उघड धमकीला काय प्रत्युत्तर देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला काय इशारा दिला आहे?

    Ans: गालिबाफ यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने थोडी जरी चूक केली, तर इराण पूर्ण ताकदीने आणि निर्णायक प्रहार करेल. त्यांनी अमेरिकेला रणांगणावर मागे ढकलल्याचा दावाही केला आहे.

  • Que: इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार आहे का?

    Ans: होय, इराण राजनैतिक चर्चेसाठी तयार आहे, परंतु गालिबाफ यांच्या मते ही चर्चा सामर्थ्याच्या स्थानावरून आणि इराणच्या अटींवर होईल.

  • Que: गालिबाफ यांच्या मते इराणची जमेची बाजू काय आहे?

    Ans: गालिबाफ यांच्या मते, अमेरिकेकडे संसाधने जास्त असली तरी इराणची 'लष्करी रणनीती' (Strategic Planning) अधिक सरस आहे, ज्याच्या जोरावर त्यांनी शत्रूला रोखून धरले आहे.

Web Title: Iran president qalibaf warning to donald trump us war strategy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा
1

India-US Trade Deal : एका बाजूला टॅरिफची धमकी अन् दुसरीकडे भारतासोबत ट्रेड डील पक्की? अमेरिकन राजदूतांचे मोठा दावा

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा
2

India-US Trade: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या चर्चेदरम्यान भारतासाठी मोठी लॉटरी; थेट अमेरिकेच्या राजदूतांनीच केली मोठी घोषणा

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ
3

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच
4

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.